शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ना रुग्णाकडे, ना घरीदारी लक्ष; नुसती दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST

संबंधित इंजेक्शन अद्यापपर्यंत माढा तालुक्यात कुठेच मिळत नसून ते सोलापूरलाच मिळत असल्याने व तेथेही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यातदेखील ग्रामीण ...

संबंधित इंजेक्शन अद्यापपर्यंत माढा तालुक्यात कुठेच मिळत नसून ते सोलापूरलाच मिळत असल्याने व तेथेही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यातदेखील ग्रामीण भागातील रुग्णांंच्या नातेवाइकांना अनेक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनबाबत डेडिकेटेड रुग्णालयांंनीच किंवा त्या डॉक्टरांनीच बाधित रुग्णांना इंजेक्शन जागेवरच उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या सूचना प्रत्यक्षात माढा तालुक्यात अद्यापपर्यंत अंमलात आल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी इंजेक्शनचे पैसे घ्या; पण आमच्या माणसांच्या जिवासाठी ते वेळेत उपलब्ध करून द्या, अशी भावनिक हाक येथील प्रशासनाकडे मारावी लागत आहे.

लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने माढा तालुक्यातील अनेक बाधित रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित इंजेक्शन मिळवण्यासाठी सोलापूरला जाऊन संपूर्ण दिवस घालवावा लागतोय तरीही ते मिळेल याची खात्री देता येत नाही, अशा परिस्थितीत ‘आमचे लक्ष ना रुग्णांकडे, ना घरी, ना दारी’ अशा भावना व्यक्त केल्या.

कुर्डूवाडी येथील डेडिकेटेड डॉ. बोबडे हॉस्पिटलमध्ये सध्या २५, डॉ. साखरे हॉस्पिटलमध्ये १७, आधार हॉस्पिटलमध्ये ५० व टेंभुर्णी येथील यशश्री हॉस्पिटलमध्ये १४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील बाधित रुग्णाला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. तालुक्यातील या सर्व हॉस्पिटलला दररोज १७५ इंजेक्शनची आवश्यकता असल्याबाबत येथील आरोग्य व महसूलच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना रविवारी सायंकाळी कळविलेदेखील आहे. परंतु अद्याप अंमलबजावणी नाही. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

------

डेडिकेटेड हॉस्पिटलमधील बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविलेले आहे. अद्याप उपलब्ध झाली नाहीत. उपलब्ध झाल्यास त्वरित त्यांंना वितरित करण्यात येतील.

-

डॉ. शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा

----

माझ्या सत्तरवर्षीय आईला रेमडेसिविरची गरज होती म्हणून सोलापूरला गेलो होतो. परंतु तेथील कागदपत्रांची पूर्तता इतकी अवघड आहे की त्यातच दमछाक होते. सकाळी गेले की संध्याकाळी उशिरा एखादे इंजेक्शन मिळते. त्यामुळे इंजेक्शन मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही सर्वत्र व्हाॅट‌्सॲपवर टाकावीत.

- मानसिंग हांडे, नातेवाईक, बाधित रुग्ण

----

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय समिती कार्य करीत आहे. परंतु संबंधित इंजेक्शनचा राज्यात सर्वत्र प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. माढा तालुक्यात मंगळवारपासून सर्व डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये जागेवरच रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल.

-भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रेमडेसिविर औषध पुरवठा देखरेख व नियंत्रण समिती, सोलापूर

----