शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
2
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
3
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
4
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
5
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
6
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
7
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”
8
ऑलिंपिकमधील क्रिकेट सामने खेळवण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणाची घोषणा!
9
“आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका
10
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
11
"हिंदूंना घंटा अन् मुस्लिमांना सौगात...! त्या वक्फ बिलाचा आणि हिंदूंचा काडीचा संबंध नाही"; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
12
"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
13
"पक्षात ज्येष्ठ नेत्यासारखे फिरतात पण साधा बूथ जिंकू शकत नाही"; राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं
14
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
15
'मला कर्करोग आहे, कोणाला सांगायचे नव्हते"; पत्नीला वेदनादायक मृत्यू देऊन पतीने स्वतःला संपवले
16
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
17
दरोडा दहा लाखाचा अन् तपासात मिळाले अडीच कोटी; ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून दरोडा
18
तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : पोलिसांनी ससूनला सादर केलेल्या अहवालानंतर चर्चा
19
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
20
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

POSITIVE 2020; चिंचोळी एमआयडीसीमध्ये नव्या वर्षात ‘एसटी’ची नवी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:54 IST

पंढरपूरला नवीन एसटी स्थानक मिळणार; सोलापूर विभाग उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यात अव्वलस्थानी

ठळक मुद्देसोलापूर एसटी स्थानक परिसरातून चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येणार चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये २७ एकर परिसरामध्ये अद्ययावत अशी नवीन विभागीय कार्यशाळामे महिन्यादरम्यान ही कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येईल

रुपेश हेळवे

सोलापूर: उत्पन्नाच्या दृष्टीने सरते वर्ष हे राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाला खूप चांगले गेले़ अनेक वेळा उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यात अव्वलस्थानी राहिले़ येणारे वर्षही एसटीसाठी चांगले असणार आहे़ येणाºया वर्षभरात एसटीची विभागीय कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी येथे हलवण्यात येणार आहे़ याचबरोबर पंढरपूरला नवीन एसटी स्थानक मिळणार आहे़ तसेच जुन्या स्थानकात काँक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वाक डे जाणार आहे.

राज्य परिवहन महामंडळ, सोलापूर विभागाची विभागीय कार्यशाळा ही  सोलापूर एसटी स्थानक परिसरातून चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येणार आहे़ चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये २७ एकर परिसरामध्ये अद्ययावत अशी नवीन विभागीय कार्यशाळा बांधण्यात येत आहे़ या कार्यशाळेचे बांधकाम नवीन वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार आहे़ यामुळे मे महिन्यादरम्यान ही कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी परिसरामध्ये हलवण्यात येईल़ येथे विभागीय भांडार आणि विभागीय कार्यशाळा असे दोन विभाग असणार आहेत़ याचबरोबर येथे एकाचवेळी अनेक गाड्यांची दुरुस्ती करण्याची व्यवस्था असणार आहे़ याचे काम एप्रिल २०१७ दरम्यान सुरू करण्यात आले होते.

राज्यभरातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने जवळपास २६ एकर परिसरामध्ये नवीन एसटी स्थानक बनवण्यात येत आहे़ याचे काम या वर्षाखेरपर्यंत संपणार आहे़ या ठिकाणी दोन इमारती बांधण्यात येत आहेत़ यात एक यात्री निवास आणि एक बसस्थानक अशा दोन इमारती असणार आहेत.बसस्थानकात एकाच वेळी ३४ गाड्यांचे प्लॅटफॉर्म असणार आहे़ या कामाची सुरुवात जुलै २०१९ मध्ये झाली असून, हे काम नवीन वर्षाखेरपर्यंत पूर्ण होईल़ याचबरोबर या इमारतींना लिफ्टची सोय असणार आहे.

याचबरोबर जुन्या एसटी स्थानकात काँक्रिटीकरणाचे कामही सुरू झाले आहे़ यामुळे पावसाळ्यात पाणी थांबण्याची अडचण दूर होणार आहे़ यासाठी जवळपास तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ या काँक्रिटीकरणाची जाडी ही ३०० एमएम असणार आहे. 

पाण्याचा पुनर्वापर होणार 

  • - चिंचोळी एमआयडीसी येथे विभागीय कार्यशाळा उभारण्यात येत आहे़ यामध्ये सिव्हिज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आहे़ यामध्ये सर्व वापरलेले खराब पाणी स्वच्छ करण्यात येणार  आह़े. 
  • - हे स्वच्छ केलेले पाणी गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणार आहे़ याचबरोबर या ठिकाणी गाड्या धुण्यासाठी दोन रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.

चालू वर्षामध्ये विभागीय कार्यशाळा चिंचोळी एमआयडीसी येथे हलवण्यात येणार आहे़ याचबरोबर नवीन एसटी स्थानक पंढरपूर येथे बांधण्यात येत आहे़ याचबरोबर पंढरपूरच्या जुन्या एसटी स्थानकात काँक्रिटीकरणाचे कामही लवकरच पूर्ण होईल़ - रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरMIDCएमआयडीसीNew Yearनववर्ष