शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी वस्तू हटावसाठी सोशल मीडियावरील नेटिझन्सचाही पुढाकार

By appasaheb.patil | Updated: June 20, 2020 12:47 IST

बहिष्कार टाकण्याचे आवाहन; फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसही चीन विरोधात

ठळक मुद्देचिनी वस्तूंमुळे येथील पारंपरिक व्यापार संकटात आला आहेचिनी वस्तूंना मागणी कमी झाल्यास स्वदेशी मालाची विक्री वाढेल टिकटॉक अ‍ॅपवरही नेटिझन्स यांनी चीनविरोधात भावना व्यक्त करणारे व्हिडिओ व पोस्ट शेअर केल्या

सोलापूर : आॅनलाईन आणि आॅफलाईन वस्तू विकत घेत असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आता जोर धरू लागली आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सोशल मीडियावरील नेटिझन्सनेही आता चिनी वस्तू हद्दपार करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. चिनी वस्तूंना विरोध करणाºया विविध व्हिडिओ क्लिप्सही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पाकिस्तानसंबंधीच्या तणावातून त्यांना मदत करणाºया चीनबाबत देशवासीयांत संतापाची भावना निर्माण झाली. दरम्यान, सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांच्या झटापटीत २० भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे. भारतीय सैनिकांना श्रद्धांजली देताना सोशल मीडियावर लोक आपले विचार मांडत आहेत. एवढेच नव्हे तर या विकृत कृत्याबद्दल सोशल मीडियावर चीनबाबत प्रचंड संतापाचं वातावरण सोशल मीडियावर दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, पणत्या, खेळणी असे एकेक क्षेत्र चिनी बाजाराने स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. याचा देशातील पारंपरिक किरकोळ व्यापार पूर्णपणे संकटात आला आहे. 

आधीच मॉल आणि सुपर मार्केट संस्कृतीने किरकोळ व्यापाºयांना संकटात आणले असताना त्यात चिनी मालामुळे त्यांचा व्यवसायच संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाल्याचीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. चिनी मालावर बहिष्कार टाका, चिनी माल विकत घेऊ नका, अशा पोस्ट सोशल मीडियावर जास्त फिरत आहेत. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा व्हिडिओ व विदेशी हटाव...स्वदेशी अपनाओ असा टॅगही सुरू झाला आहे. दरम्यान, या मोहिमेला भावनिकतेशी न जोडता केवळ देशातील किरकोळ व्यापाराच्या दृष्टीने जोडण्यासाठी सोशल मीडियावरील नेटिझन्सनी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे.

टिकटॉकवरही चीनविरोधात व्हिडिओ पोस्टकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून चीनने निर्मित केलेल्या सर्व प्रकारच्या सामानावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. त्यातच आता भारत-चीन सीमेवरील या दोन देशांमधील वाढता संघर्ष लक्षात घेता मोबाईल फोनमधून चीनने बनवलेल्या अ‍ॅप्सला अनइन्स्टॉल करण्याचे प्रमाण वाढत आहे. एवढेच नव्हे तर मुळात चीनच्या असलेल्या टिकटॉक अ‍ॅपवरही नेटिझन्स यांनी चीनविरोधात भावना व्यक्त करणारे व्हिडिओ व पोस्ट शेअर केल्या आहेत.

चीन हा आपल्या देशाच्या शत्रूला मदत करीत आहे, हा एक विषय आहे. पण, त्यापेक्षा भीषण म्हणजे, या चिनी वस्तूंमुळे येथील पारंपरिक व्यापार संकटात आला आहे. त्याचे दुष्परिणाम येथील किरकोळ व्यावसायावर होत आहेत. चिनी वस्तूंना मागणी कमी झाल्यास स्वदेशी मालाची विक्री वाढेल, परिणामी देशात रोजगार निर्मिती वाढेल.-विजय पुकाळे,व्यावसायिक, नवीपेठ.

टॅग्स :SolapurसोलापूरSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलchinaचीनMarketबाजार