शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:51 IST

प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ 

ठळक मुद्देवालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रगौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ : डॉ़ चंद्रकांत चव्हाण

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ याप्रसंगी विश्वस्त भूषण शहा, प्ऱ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण, समन्वयक डॉ़ धनराज पाटील, डॉ़ सिद्राम सलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती़आपल्या अभ्यासपूर्ण बीजभाषणात तथागत गौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ समाजाला दिशा देण्याचे काम प्राध्यापकांचे असल्याचेही ते म्हणाले़ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण म्हणाले, स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ मनुष्य हा समाजशील प्राणी असून मानवी विकासात समाजशास्त्राचे योगदान महत्त्वाचे आहे़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ़ धनराज पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ़ अशोक गायकवाड यांनी करून दिला़ सूत्रसंचालन प्रा़ मनोहर जोशी यांनी केले तर आभार डॉ़ संगमेश्वर नीला यांनी मानले़ यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर