शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने  ' जवाब दो ' विराट मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 16:14 IST

सोलापुरातील रस्ते,वीज , पाणी, कचरा या मूलभूत प्रश्नांकडे  सत्ताधारी भाजपचे कोणतेही  नाही. परिवहन कामगार अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत.

ठळक मुद्दे गट-तट लवकरच संपतील - कोते - पाटील नाराज कार्यकर्ते मोर्चात सहभागीमोर्चातील एका शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना मागण्यांचे निवेदन दिले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : विस्कळीत पाणीपुरवठा, आजारी दवाखाने, डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचे थैमान, खराब रस्ते,स्मार्ट सिटीचा उडालेला बोजवारा, कच-याची समस्या, मोकाट जनावरे,भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर, मनपातील महत्वाची रिक्त पदे, परिवहन कामगारांच्या तीन महिन्यांपासून रखडलेल्या पगारी, गाळे भाडेवाढीचा लटकलेला निर्णय, शौचालयांअभावी महिलांची होणारी कुचंबणा आदी प्रश्नांकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली  सोलापूर महापालिकेवर विराट जवाब दो मोर्चा काढण्यात आला़ यावेळी संग्राम कोते-पाटील म्हणाले की, सोलापुरातील रस्ते,वीज , पाणी, कचरा या मूलभूत प्रश्नांकडे  सत्ताधारी भाजपचे कोणतेही  नाही. परिवहन कामगार अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असतानाही निधी मिळत नाही. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून स्मार्ट घोषणांशिवाय लोकांना दुसरे काहीही ऐकायला मिळत नाही. विकास झालेल्या परिसराचाच स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करण्याचे काम सुरु आहे. फसलेली नोटबंदी आणि जीएसटीमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.नोटबंदीनंतर सुमारे ४१ लाख लोकांचे रोजगार गेले आहेत. शेतक-यांचितर पूर्णपणे वाट लागली आहे. आज भाजप सरकारमध्ये डॉक्टरही सुरक्षित नाहीत. लोकप्रिय घोषणा करायच्या आणि लोकांना फसवायचे हे एकमेव धोरण भाजपने आखले आहे. त्यामुळे सोलापूरचे विकासाचे प्रश न सुटल्यास आगामी काळात यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देतानाच आयुक्तांनाही कोते - पाटील यांनी अल्टिमेटम दिला. सुमारे एक लाख युवकांचा मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  दरम्यान चार हुतात्मा पुतळा येथून दुपारी बारा वाजता वाजत गाजत मोचार्ला प्रारंभ झाला़ भाजप सरकार हाय हाय. झुटे वादे झुटे बोल भाजप 'तेरी खुल गई पोल. मोदी- शहा खुशहाल जनता बेहाल . भाजप सत्तेवर जनता रस्त्यावर. कचरा व स्वच्छतेचे नियोजन काय. मी लाभार्थी डेंग्यूचा. मी लाभार्थी स्वाईनफ्लूचा अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. राष्ट्रवादीचे झेंडे. सरकारविरोधी फलक. गळ्यात पक्षाचे उपरणे घातलेले पुरुष  आणि महिला कार्यकर्ते मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोचार्तील एका शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि शहरवासियांना येत असलेल्या  अडचणी सोडविण्याबाबत चर्चा केली.       राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार ,माजी महापौर मनोहर  सपाटे,युवकचे जिल्हा निरीक्षक प्रदीप कंद,जिल्हाध्यक्ष विक्रांत माने,राजन जाधव,महिला प्रदेश सचिव वैशाली गुंड, अल्पसंख्यांकचे अध्यक्ष राजू कुरेशी, चंद्रकांत पवार,मल्लेश बडगू,प्रशांत बाबर,दिनेश शिंदे,अनिल पानसे,प्रा.भोजराज पवार,डॉ.दादाराव रोटे,जनार्दन बोराडे,महिला आघाडी अध्यक्ष सुनीता रोटे,गौरा कोरे,संगीता कांबळे,मुमताज पठाण,हवेली तालुका विद्यार्थी अध्यक्ष सागर तळेकर,अहमद मासुलदार,निशांत सावळे,सुहास कदम, विजय भुईटे,अमीर शेख,महेश कुलकर्णी, प्रमोद भोसले,राजू हुंडेकरी,राज बिटला,डॉ.गोवर्धन सुंचू, सिकंदर गोलंदाज, शाम गांगर्डे, युवराज माने, बालाजी सगलूर, मुश्ताक पटेल ,युवराज राठोड, रिजवान बागवान, रुपेश भोसले, सोमा बंदाई यांच्यासह पक्षाचे सोलापुरातील नेते , सर्व सेलचे अध्यक्ष आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय जावेद खैरदी,अल्ताफ कुरेशी,अक्षय बचुटे, राजू हुंडेकरी,प्रवीण इरकशेट्टी,रवी गुब्याडकर,अनिल जाधव आदी मंडळी मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Solapur Municipalसोलापूर महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस