शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !

By admin | Updated: February 28, 2017 17:42 IST

जि़प़ निवडणूक: तीन तालुक्यात भाजप आघाडीवर, ग्रामीण भागात भाजपची जोरदार मुसंडी

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !सोलापूर: शिवाजी सुरवसे सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीच जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला राहिला आहे़ सहा तालुक्यात राष्ट्रवादी पुढे असून तीन तालुक्यात भाजपने क्रमांक एक ची मते मिळविली आहेत़ बार्शीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला जवळपास बरोबरीची मते मिळाली आहेत़ १३ लाख २४ हजार १२१ मतांपैकी ३ लाख ९३ हजार २४९ मते घड्याळाला तर ३ लाख २१ हजार ६९३ मते कमळाला पडली आहेत़ नगण्य असणाऱ्या भाजपने ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे़ माळशिरस, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, उ़ सोलापूर या सहा तालुक्यात राष्ट्रवादीला क्रमांक एक ची तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या तीन तालुक्यात भाजपला क्रमांक एक क्रमांकाची मते मिळाली आहे़माळशिरसमध्ये २ लाख ३० हजार ९२१ मतदान झाले त्यापैकी तब्बल १ लाख ११ हजार ७२७ मते घड्याळाला पडली आहेत़ इतर तालुक्यांच्या तुलनेत माळशिरसमध्ये सर्वाधिक मते राष्ट्रवादीने खेचून घेतली आहेत़ या तालुक्यात भाजपला ७६ हजार ५१७ मते मिळाली आहेत व काँग्रेसला अवघ्या ९ हजार ५७२ मतांवर समाधान मानावे लागले़ या ठिकाणी सेनेला १७ हजार मते मिळाली आहेत़मोहोळ तालुक्यात १ लाख २५ हजार ९३९ मतदारांनी मतदानांचा हक्क बजाविली़ त्यापैकी ६४ हजार ८८० मते घड्याळा तर अवघी ३३६७ मते कमळाला मिळाली आहेत़ भीमा आघाडीने १४ हजार ५३६ मते मिळलिी आहेत़ उ़ सोलापूर मध्ये ४७ हजार ६८९ पैकी एकाच जागेवर राष्ट्रवादीने १२ हजार १६३ मते मिळवून क्रमांक एक वर शिक्कमोर्तब केला आहे मात्र या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती़ या तालुक्यात काँग्रेसला १० हजार ५७० मते मिळाली आहेत़ बार्शी तालुक्यात १ लाख ४१ हजार ६७ मतांपैकी राष्ट्रवादीला ६६ हजार ४९३ तर भाजपला ६६ हजार ३६२ मते मिळाली आहेत़ राष्ट्रवादीला भाजपपेक्षा अवघी ३१ मते अधिक मिळाली आहेत़ करमाळ्यात १ लाख १८ हजार ५५२ मतांपैकी राष्ट्रवादीला ४५ हजार ९५४ तर सेनेला ४४ हजार ३५६ एवढी मते मिळाली आहेत़ माढ्यात १ लाख ५२ हजार मतांपैकी राष्ट्रवादीला ५५ हजार ९५४ तर सेनेला ४४ हजार ३५६ एवढी मते मिळाली आहेत़ या ठिकाणी भाजपचे उमेदवार नव्हते तर काँग्रेसला या तालुक्यात नोटा पेक्षा देखील कमी मते मिळाली आहेत़ इथे नोटाला १५७१ तर काँग्रेसला १०६५ मते मिळाली आहेत़दक्षिण सोलापुरात १ लाख ८ हजार मतांपैकी ४१ हजार २१ मते मिळाल्यामुळे तालुक्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला आहे़ या ठिकाणी काँग्रेसला ३९ हजार ९६५, सेनेला १२ हजार ४४० तर काँग्रेसला अवघी ७२६४ मते मिळाली आहेत़ अक्कलकोट तालुक्यात १ लाख ३१ हजार ७४ मतांपैकी भाजपने ५८ हजार ४६५ अशी क्रमांक एक ची तर काँग्रेसने ५४ हजार ९२९ एवढी दुसऱ्या क्रमांकची मते मिळविली आहेत़ या ठिकाणी राष्ट्रवादीला (१९९३) नोटा (२२३८) पेक्षा कमी मते मिळाली आहेत़ पंढरपुरात १ लाख ५२ हजार ५२१ मतांपैकी भाजपने ४५ हजार ८७४ मते घेऊन तालुक्यावर भाजपचा झेंडा लावला़ या तालुक्यात काँग्रेसला २० हजार २४२ तर घड्याळाला १९ हजार ९५९ एवढी मते मिळाली आहेत़ इन्फोजि़प़ मध्ये एकही सदस्य नसलेल्या भाजपचे आता १४ सदस्य निवडूण आले आहेत़ ११ पंचायत समित्यांच्या १३६ जागांमध्ये देखील भाजपने ७७ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पंचायत समितीवर स्थान मिळविले आहे़ भाजप ७७, काँग्रेस १७, राष्ट्रवादी ४४, शिवसेना ९, स्थानिक आघाड्या २१, अपक्ष १२ असे पंचायत समितीमधील बलाबल आहे़.......इन्फो बॉक्स़़़जि़प़ पक्षनिहाय व आघाडीनिहाय मिळालेल्या जागाकरमाळा ५जागा- शिवसेना ४, राष्ट्रवादी १, माढा ७ जागा-राष्ट्रवादी ५, आघाडी १, अपक्ष १बार्शी ६ जागा-भाजप ३, राष्ट्रवादी ३उ़सोलापूर २-राष्ट्रवादी १, काँग्रेस १मोहोळ ६ जागा- राष्ट्रवादी ३, आघाडी ३पंढरपूर ८ जागा- भाजप ४, राष्ट्रवादी १, आघाडी ३सांगोला ७ जागा- आघाडी २, अपक्ष ५मंगळवेढा ४ जागा- काँगे्रस १, आघाडी ३द़ सोलापूर ६ जागा- भाजप २, काँग्रेस २, राष्ट्रवादी १, सेना १अक्कलकोट ६ जागा- भाजप २, काँग्रेस ३, अपक्ष १माळशिरस ११ जागा- भाजप ३, राष्ट्रवादी ८......चौकट़़़़१३ लाख पैकी ३़२१ लाख मते भाजपला २१ लाख ४६ हजार मतदारांपैकी १३ लाख २४ हजार १२१ मतदारांनी मतांचा अधिकार बजाविला़ यामध्ये राष्ट्रवादीला ३ लाख ९३ हजार २४९ मते (३० टक्के), भाजपला ३ लाख २१ हजार ६९३ (२४ टक्के), काँग्रेसला १ लाख ६५ हजार मते (१२ टक्के) तर सेनेला १ लाख २५ हजार मते (९ टक्के) मते मिळाली आहेत़ १७ हजार ७४४ जणांनी ह्यनोटाह्ण ला आपली पसंती दिली आहे़ मंगळवेढा आणि पंढरपूर मध्ये स्थानिक आघाड्यांना जास्त मते मिळाली आहेत़