शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
5
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
6
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
7
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
8
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
9
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
10
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
11
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
12
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
13
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
14
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
15
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
16
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
17
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
18
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
19
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
20
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला केवळ सहा हजारांचे मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 13:08 IST

माढा लोकसभा निवडणुक विश्लेषण; संजयमामा शिंदे यांना माढा तालुक्यातील ७८ गावांमधून केवळ १७ हजारांची आघाडी मिळाली.

ठळक मुद्देमाढा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ७८ गावांचा समावेशमाढा, मोडनिंब, उपळाई (ब) या मोठ्या गावांमधून निंबाळकर यांना मतदारांनी भरभरून मते दिलीसंजयमामा शिंदे यांना माढा तालुक्यातील ७८ गावांमधून केवळ १७ हजारांची आघाडी मिळाली

डी. एस. गायकवाड

टेंभुर्णी : माढा विधानसभा मतदारसंघातील संजयमामा शिंदे यांच्या सर्व विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून शिंदे यांना होमपीचवर घेरल्याने त्यांना या हक्काच्या मतदारसंघातून केवळ सहा हजारांचे मताधिक्य मिळाले. या उलट मोहिते-पाटील कुटुंबीयांनी माळशिरसमधून एक लाखाचे मताधिक्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिल्यामुळेच संजय शिंदे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील ७८ गावांचा समावेश आहे. या गावांमधून शिंदे यांना केवळ १७ हजारांचे मताधिक्य मिळविण्यात यश आले. माढा तालुक्यातील टेंभुर्णी, पिंपळनेर, बेंबळे, मानेगाव यासह छोट्या-मोठ्या गावांतून शिंदे यांना बºयापैकी लीड मिळाली. परंतु माढा, मोडनिंब, उपळाई (ब) या मोठ्या गावांमधून निंबाळकर यांना मतदारांनी भरभरून मते दिली. तालुक्यातील शिंदे विरोधक प्रथमच एकसंध राहून प्रचारात उतरले होते. त्यामुळे अनेक गावात घासून मतदान झाले. त्यामुळे संजयमामा शिंदे यांना माढा तालुक्यातील ७८ गावांमधून केवळ १७ हजारांची आघाडी मिळाली.

या विधानसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील १४ गावांचा समावेश आहे. यामध्ये महाळुंग व बोरगाव गटाचा समावेश आहे. या १४ गावात मोहिते-पाटलांचे वर्चस्व असल्याने येथे एकतर्फी मतदान झाले. येथून नाईक-निंबाळकर यांना सुमारे २२ हजार मते मिळाली तर संजयमामा शिंदे यांना केवळ ५ हजार मतांवर समाधान मानावे लागले. निंबाळकर यांना महाळुंग व बोरगाव गटातील १४ गावांतून १७ हजारांची लीड मिळाली. यामुळे माढा तालुक्यातील ७८ गावांतून शिंदे यांना मिळालेली सतरा हजारांची लीड न्यूट्रल झाली.माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांचा समावेश आहे. या ४२ गावांमधील करकंब येथे घासून मतदान झाले तर भोसे गावातून शिंदे यांना सुमारे २३०० एवढे मताधिक्य मिळाले. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांमधून मिळालेली सुमारे ६ हजारांची लीड हीच माढा विधानसभा मतदारसंघातील शिंदे यांचे मताधिक्य राहिले.

२९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्तमाढा लोकसभा मतदारसंघातून एकूण ३१ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत संजय शिंदे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात झाली. माढा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. विजयराव मोरे यांना केवळ ९ हजार ५५२ मतांवर समाधान मानावे लागले. इतर कोणत्याही उमेदवाराचा या निवडणुकीवर परिणाम झाला नाही. मोरे यांच्यासह सर्वच्या सर्व २९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmadha-pcमाढा