शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नवलाई...थुई थुई नाचणारी लाजाळू टर्की कोंबडी सर्वाचेच आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:02 IST

कुर्डूवाडीत होतयं संगोपन; वजन तिचं २० किलो अन् उडी मारते २० फूट अंतरावरपर्यंत

ठळक मुद्देसध्या मार्केटमध्ये देशी कोंबडी, विलायती कोंबडी, क्रॉस जनरेशन, काळी मुर्गी अशा विविध जाती आहेतबार्शी नाक्यावरील आयाज गुलाब शेख यांच्या कुटुंबीयांनी या अनोख्या टर्की कोंबडीचं संगोपन सुरु केलंयकोंबडी व तिच्या अंड्यापासून लोहरस व कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळत असल्याचा दाखला यूट्यूबवर पाहायला मिळतो

कुर्डूवाडी : जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया कुर्डूवाडी शहरामध्ये शौकिनांची संख्या काही कमी नाही. इथलं एक कुटुंब वेगळ्याच कारणामुळं चर्चेच्या झोतात आलं आहे. लाजाळूू अन् थुई थुई नाचणाºया टर्की कोंबडीचं संगोपन केलं आहे. तिचा नाच पाहण्यासाठी परिसरातील बालगोपाळांची एकच गर्दी होतेय. वजनाने २० किलो असली तरी ती चक्क २० फूट अंतरावर उडी मारत असल्याचे सांगण्यात येतंय. 

बार्शी नाक्यावरील आयाज गुलाब शेख यांच्या कुटुंबीयांनी या अनोख्या टर्की कोंबडीचं संगोपन सुरु केलंय. यामुळेच की काय ते कुर्डूवाडीसह पंचक्रोशीत प्रसिध्द झाले आहेत. ही कोंबडी अंदाजे २० किलो वजनाची असून, ती साधारण २० फुटांच्या अंतरावर झेप घेते. तिचा नाच मोरासारखा पिसारा फुलवून असल्याने तो मोहक असतो, हा नाच पाहण्यासाठी आजूबाजूचे बालगोपाळ, आबालवृद्ध मंडळी आवर्जून येतात,असं आयाज शेख सांगतात. 

सध्या मार्केटमध्ये देशी कोंबडी, विलायती कोंबडी, क्रॉस जनरेशन, काळी मुर्गी अशा विविध जाती आहेत, मात्र टर्की मुर्गी ही संकल्पनाच शहरवासीयांसाठी नवीन आहे. या कोंबडीचे वजन पूर्ण विकसित झाल्यानंतर साधारणत: २० किलोपर्यंत भरते व तिचे आयुष्य १२ ते १५ वर्षांपर्यंत असते. 

अन्य कोंबड्यांप्रमाणेच या कोंबडीचेही गहू, ज्वारी, मका, बाजरी, तांदूळ असे खाद्य आहे. मात्र या कोंबडीसाठी हे धान्य एकत्र करुन भरडून आणावे लागते. याची वाढ झपाट्याने होते. दिसायला सुंदर आहेक़ोंबडी आजारी पडल्यावर टेटरासायकक्लीन नावाचे औषध पाण्यात मिसळून दिल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही. या टर्की मुर्गीचे अंडेही देशी कोंबड्यांपेक्षा मोठे असून, त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात याची मार्केटमध्ये किंमत ८० ते १०० रुपयांपर्यंतच असल्याचे आयाज शेख म्हणाले. 

ही कोंबडी व तिच्या अंड्यापासून लोहरस व कॅल्शियम जास्त प्रमाणात मिळत असल्याचा दाखला यूट्यूबवर पाहायला मिळतो. या कोंबडीला मोठ्या शहरातील हॉटेलात मागणी असल्याचं शेख सांगतात. 

देशी कोंबडीनं उबवली टर्कीची अंडीआयाज यांचे बंधू रियाज यांनी या टर्की मुर्ग्या पाहून त्यांची १० अंडी विकत आणली व ती देशी कोंबडीच्या खाली उबवून घेतली. यानंतर त्यातून टर्की प्रजातीची १० पिल्लं तयार झाली व ती देशी कोंबडीच्या मागे फिरुन मोठी केली. यात त्यांना खाद्य देऊन आठ दिवसांतून एकदा फॅशनील नावाचे जंतनाशक पाजण्यात आले़ त्यांची योग्य ती देखभाल केल्याने ही पिल्ली मोठी झाली.

मोरासारखा फुलवते पिसारा- शेख यांच्याकडे सध्या २ मादी व ३ नर अशा ५ टर्की कोंबड्या आहेत. ही जात अगदी लाजाळू आहे. हे पक्षी आनंदी झाल्यानंतर त्यांच्या चोचीवर चरबीसारखा पदार्थ अगदी १० इंचापर्यंत खाली येतो. त्यानंतर पिसारा फुलवून मोरासारखा थुई थुई नाचतात. संकटकाळी कुणी झडप घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्या संरक्षणार्थ चक्क २० फूट अंतरावर झेप घेत असल्याचं शेख यांनी सांगितलं.

टॅग्स :Solapurसोलापूरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य