शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 14:24 IST

सोलापूर जिल्ह्याचे राजकारण; भेटीचे कारण साखर कारखान्याचे,  खलबते मात्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर

ठळक मुद्देपंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आ. भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत आ. भालके यांना विचारले असता, ‘लोक काहीही चर्चा करतात’ असे ते म्हणाले

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आ. भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साखर कारखान्याच्या कामाबाबत चर्चा केली. त्यांच्या भेटीतील विषय कोणताही असो, पण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याने ‘नाना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात म्हणजे चर्चा तर होणारच!’, अशी चर्चा पंढरपूर, मंगळवेढ्यात रंगू लागली आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ४ जून रोजी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आ. भारत भालके हेही उपस्थित होते. शिवाय आ. भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. याबाबत आ. भालके यांना विचारले असता, ‘लोक काहीही चर्चा करतात’ असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांशी माढ्याचे खा़  रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भेट घेऊन चर्चा केली होती.  त्यांनीही अशीच उत्तरे दिली होती़ त्यानंतर त्या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला़ ही काही खूप जुनी गोष्ट नाही़ ही घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्र्यांना आ. भारत भालके भेटून चर्चा करतात़ त्यामुळे तेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार ? अशी नागरिकांमधून चर्चा होणे स्वाभाविक आहे़ आ़ भारत भालके हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यावर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी मिळणार  का? अशीही चर्चा आहे़ परंतु हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे़ त्यामुळे ही जागा शिवसेना भाजपला सोडणार का? आ़ भारत भालके यांना उमेदवारी दिली तर आ़ प्रशांत परिचारक, शिवसेना महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचे काय होणार? अशीही चर्चा झडत आहे.

राहिला प्रश्न तो आ़ प्रशांत परिचारक यांचा़ त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी द्यायची, गतवेळेला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतदारांची संख्या सर्वाधिक असतानाही आ़ प्रशांत परिचारक हे दीपक साळुंके यांना पराभूत करून विजयी झाले होते. आता तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे़ त्यामुळे आ़ प्रशांत परिचारक हे विधान परिषदेवर सहजासहजी विजयी होतील.

शैला गोडसे या विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला़ तेव्हापासून त्या मतदारसंघात प्रचार दौरा करीत आहेत़ मात्र त्यांना पदवीधर मतदारसंघ देऊन त्यांचीही अडसर दूर करायची, असे गृहित धरून आ. भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याची चर्चा दोन्ही तालुक्यात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्नपंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात लोकसभेला काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे़ आ़ भारत भालके यांच्या मतदारांशी थेट संपर्कामुळे शक्य झाल्याचे बोलले जाते़ त्यामुळे आ़ भारत भालके यांना भाजपमध्ये घेऊन ही जागाही वरिष्ठ पातळीवर चर्चा करून भाजपला घ्यायची आणि आ़ भारत भालके यांना उमेदवारी देऊन या मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याची चर्चा आहे़

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९madha-pcमाढाPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस