शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाचे पुराण संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:35 IST

१० हजार शेतकऱ्यांचे ११ कोटी अडकले; वर्षभरापासून पणन मंडळाकडे प्रस्ताव

सोलापूर: तत्कालीन भाजपा सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाचे कांदा पुराण अद्याप संपलेले नाही. सोलापूर व सांगली जिल्ह्यातील १० हजार ८ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ८८ लाख २७ हजार रुपये शासनाने अद्याप मंजूर केले नाहीत.

२०१८- १९ मध्ये राज्यात कांद्याचे दर कोसळले होते. कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणी केला नाही तर अनेकांनी विक्रीसाठी बाजारात आणला नाही. ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्याला अत्यल्प दर मिळाल्याने तत्कालीन भाजपा सरकारने प्रति क्विंटल २०० रुपयाप्रमाणे अनुदान जाहीर केले होते. त्याप्रमाणे ३ लाख ९४ हजार ७६० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३९० कोटी ३३ लाख ५८ रुपये जमा करण्यात आले असल्याचे राज्य पणन मंडळाकडून सांगण्यात आले. अद्याप ९३८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९१ लाख ७७ हजार रुपये इतकी रक्कम जमा झालेली नाही. काही तांत्रिक बाबीमुळे ही रक्कम अद्याप जमा झाली नसल्याचे सांगण्यात आले.

असे असले तरी १० हजार ८ शेतकऱ्यांसाठी १० कोटी ८८ लाख २७ हजार रुपये शासनाने अद्याप मंजूर केले नसल्याचे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून सांगण्यात आले. दोन वर्षांपूर्वी ( २०१८-१९) मध्ये जाहीर केलेल्या कांदा अनुदान रक्कम मंजुरीचा जिल्हा उपनिबंधकांकडून आलेला प्रस्ताव पणन मंडळाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र शासनाकडून अनुदान मंजूर झाले नसल्याचे सांगण्यात आले.

बार्शीचे सर्वाधिक शेतकरी अडकले

  • - सांगली बाजार समितीने ७६२ शेतकऱ्यांसाठी ७६ लाख ६४ हजार ३१४ रुपयांची मागणी २० डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली.
  • - सोलापूर बाजार समितीने १३ डिसेंबर २०१९ रोजी ११७२ शेतकऱ्यांसाठी दोन कोटी ६४ लाख ६० हजार रुपयाची मागणी केली आहे.
  • -१० जानेवारी २०२० रोजी लक्ष्मी सोपान ॲग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कंपनीने ८ हजार ७४ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ४७ लाख ३ हजार रुपयाची मागणी केली आहे.

 

१८- १९ मध्ये कांद्याला भाव नव्हता. २० मध्ये कोरोना होता तर २१ मध्ये कांदा पावसामुळे वाहून गेला. शेतकऱ्यांवर दर वर्षी संकटाची मालिका सुरू आहे. आता वीज बिल भरा नाही तर कनेक्शन बंद करण्याचा तगादा आहे. सांगा काय करायचे.

- राजाराम गरड, कांदा उत्पादक शेतकरी

 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाBJPभाजपाGovernmentसरकार