शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सांगोला तालुक्यात दोघांचा मर्डर; कोळे गावातील मोठी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2024 10:38 IST

दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अरुण लिगाडे, सांगोला :  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोळे (ता. सांगोला) येथे दोन गटात चाकू धारदार शस्त्र, काठी, लाकडी फळीने केलेल्या  जबर मारहाणीत दोघांचा खून करण्यात आला तर दोन्ही गटातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोन खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून, तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, अज्ञात कारणावरून सहाजणांनी संगणमत करून चाकूने पोटात भोसकून एकाचा खून केला तर एकास पोटात भोसकून गंभीर जखमी केले तर दुस-या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून सहाजणांनी लाकडी फळीने व हाताने लाथाबुक्क्यांनी केलेल्या हाणामारीत एकाचा खून केला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री कोळे (ता. सांगोला) गावात घडली. बाळू शामराव आलदर (रा. संत तुकाराम नगर ,आलदर वस्ती कोळे ता. सांगोला) व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, कोळे ता. सांगोला) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत, कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी  पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली असून, पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी समवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेवून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी