शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

मनपा, पोलिस अधिकारी निष्क्रिय त्यांना समज द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

By राकेश कदम | Published: September 04, 2023 4:17 PM

उच्च न्यायालयात तक्रार करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : शहरातील फूटपाथ, चौकाचौकात फ्लेक्स लावण्याचे प्रकार वाढले आहेत. हे फ्लेक्स हटविण्यात मनपा अधिकारी आणि पोलिस अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत. त्यांना समज देऊन फ्लेक्स हटविण्यास सांगा अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

कायद्याच्या नाकावर टिच्चून शहरातील चौका-चौकात फ्लेक्स, डिजीटल होर्डिंग लावली जात आहेत. यातून सामाजिक शांतता धोक्यात आल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. यासंदर्भातील वृत्त नुकतेच लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताच्या आधारे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम विभागीय अध्यक्ष शाम कदम आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना निवेदन दिले. उच्च न्यायालयाने होर्डिंग आणि फ्लेक्सबाबत नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करण्याचे काम शहरात सुरू आहे. शहरातील फूटपाथ गायब झाले असून व्यापार धोक्यात आला आहे. मोठ मोठी झाडे तोडून अनधिकृत होर्डिंग लावली जात आहे. पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

जिल्ह्याचे प्रमुख् म्हणून आपण मनपा आयुक्त शितल तेली उगले, पोलिस आयुक्त राजेंद्र माने आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन द्यावी. अन्यथा आम्ही उच्च न्यायालयाचा अवमान झाला म्हणून तक्रार दाखल करू. मनपा अधिकाऱ्यांविरुध्द फिर्याद देऊ असा इशाराही शाम कदम यांनी दिला. यावेळी अरविंद शेळके, सीताराम बाबर, राजेंद्र माने, दत्तात्रय भिंगणे, ओंकार कदम आदी उपस्थित होते.