शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मनपाच्या गाळ्यांचे लिलाव होणार नाहीत, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती, सोलापूर शहराचे प्रश्न निकाली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:26 IST

मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

ठळक मुद्देमनपाच्या मुदत संपलेल्या मेजर व मिनी गाळ्याच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित प्रशासनाने मुदत संपलेल्या गाळ्यांमधून चांगले उत्पन्न येण्यासाठी बाजारभावाप्रमाणे गाळ्यांचे दर निश्चित होण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्तावशासनाकडे पहिल्यांदा हा प्रस्ताव पाठविल्यावर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांनी अधिकारात हा निर्णय घ्यावा म्हणून परत पाठविला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : मनपाच्या मालकीच्या गाळेभाडेवाढीचा प्रश्न येत्या आठवडाभरात मार्गी लावला जाईल, यात कोणत्याही गाळ्यांचे लिलाल न करता मध्यमार्ग काढला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे बोलताना दिली. मनपाच्या मुदत संपलेल्या मेजर व मिनी गाळ्याच्या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत सभागृहात दोनवेळा ठराव झाला. प्रशासनाने मुदत संपलेल्या गाळ्यांमधून चांगले उत्पन्न येण्यासाठी बाजारभावाप्रमाणे गाळ्यांचे दर निश्चित होण्यासाठी लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला सभेत विरोध झाला. शासनाकडे पहिल्यांदा हा प्रस्ताव पाठविल्यावर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांनी अधिकारात हा निर्णय घ्यावा म्हणून परत पाठविला. त्यावर आयुक्तांनी ई निविदा पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिल्यावर पुन्हा विरोध झाल्याने पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. यावर बोलताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हा राज्यभराचा प्रश्न आहे. गाळ्यांच्या भाडेवाढीबाबत शासन एक सर्वंकष धोरण ठरवित आहे; मात्र यातील लिलाव पद्धत काढून टाकण्यात आली आहे. यात जे सध्या मूळ व्यापारी आहेत, त्यांच्यावर अन्याय न होता भाडेवाढ कशी करायची हे ठरविले जाणार आहे. आठवडाभरात हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या दौºयात डॉ. पाटील यांनी मनपा व नपासाठी असलेल्या शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.  पंतप्रधान व रमाई आवास योजनेतील अडचणी जाणून घेतल्या. यातील जाचक अटी काढून सर्व गरिबांना २0२२ पर्यंत घर मिळेल यावर भर दिला जाणार आहे. ही योजना राबविण्यासाठी काही क्रेडाईचे बिल्डर पुढे आले आहेत. त्यांना आवश्यक ती मदत केली जाईल. मनपाची सांडपाणी प्रक्रिया व तुळजापूर कचरा डेपोजवळील वीज निर्मिती प्रकल्पाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.-------------------------अशोक लेलँडची चौकशीकेंद्रीय योजनेतून मनपा परिवहनला पुरविण्यात आलेल्या ९९ जनबसच्या चेसीक्रॅक झाल्या. पण याबाबत अशोक लेलँड कंपनीने हात वर केल्याने परिवहनची स्थिती नाजूक झाल्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी अशोक लेलँडची चौकशी केली जाईल असा इशारा दिला. एकाचवेळी इतक्या बसची चेसीक्रॅक होते ही बाब गंभीर आहे. कंपनीचा डिफेक्ट असताना प्रश्न प्रलंबित ठेवणे बरोबर नाही. याबाबत योग्य ती माहिती घेऊन कारवाई करू असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका