शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

 सोलापुरातील कोरोनाग्रस्त मृत रूग्णांच्या अंत्यविधीसाठी सरसावले तरुण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 15:52 IST

महापालिकेची समस्या सुटली: सोलापूर महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद; टायगर ग्रुपच्या सदस्यांचा पुढाकार

ठळक मुद्देटायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी कोरोनाने मरण पावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी मदत करण्याची तयारी दर्शविलीकोरोनाने मरण पावलेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी लागणाºया यंत्रणेचे पाठबळ महापालिकेकडे कमी झाले होते

सोलापूर : कोरोना वॉरिअर्स म्हणून काम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत टायगर ग्रुपच्या सदस्यांनी कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांचा अत्यंविधी उरकण्याची जबाबदारी उचलली आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोना वॉरिअर्स म्हणून तरुणांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. यात कोरोना रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मार्गदर्शन व त्यांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत करण्याच्या समावेश आहे. तसेच कोरोनाने मरण पावलेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी लागणाºया यंत्रणेचे पाठबळ महापालिकेकडे कमी झाले होते. आरोग्य विभागातील बरेच कर्मचारी हे काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे हे काम संथगतीने होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 

टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण यांनी कोरोनाने मरण पावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. त्याप्रमाणे त्यांच्या ग्रुपमधील तानाजी जाधव, श्रीमंत चव्हाण, केतन देवी, मधुकर कुरापाटी, प्रल्हाद कळसकर, सागर राठोड, अवी पवार यांनी काम सुरू केले आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी व समन्वयक पांडे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेऊन अ‍ॅम्बुलन्समधून अंत्यविधीच्या ठिकाणी नेणे व ती प्रक्रिया पार पाडेपर्यंत हे तरुण काम करीत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात निर्माण झालेली समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. 

महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कविता चव्हाण आणि त्यांच्या ग्रुपने कोरोनाग्रस्तांना अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलली असून यांचे पथक चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. शहरातील ज्या तरूणांना विविध स्तरावर काम करावयाचे आहे त्या तरूणांनी पुढे यावे़ - पंकज जावळे, उपाआयुक्त, सोलापूर महानगरपालिका

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका