शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातील बड्या थकबाकीदारांना महापालिका बजावणार नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 11:33 IST

सोलापूर : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा ...

ठळक मुद्दे५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा बजाविण्यात येणारमहापालिका प्रशासनाने यंदा वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले१५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वॉरंट बजावण्यात येईल

सोलापूर : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुली मोहिमेला सुरुवात केली आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणाºया मिळकतदारांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी  दिली.

महापालिका मिळकत कराची थकबाकी मोठ्या प्रमाणावर आहे. प्रशासनाने मिळकतदारांना यापूर्वीच संगणकीकृत बिलांचे वाटप केले आहे. बिल मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत कर भरणाºयांना पाच टक्के सवलत देण्यात आली होती. याचा लाभ घेणारेही अनेक मिळकतदार आहेत. अशा मिळकतदारांसाठी यंदा प्रथमच आॅनलाईन व विभागीय कार्यालय आणि बँकांमध्ये बिल स्वीकृत करण्याची सोय केली आहे. याचा चांगला फायदा प्रशासनाला झाला. तरीही अनेक मिळकतदार मार्चअखेर बिल भरू असा विचार करून लवकर बिल भरणे टाळतात. त्यामुळे त्यांची थकबाकी वाढत जाते. बरेच मिळकतदार नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. त्यांचीही बिले थकीत राहिली जातात. 

सध्या जीएसआय सर्वेक्षणाच्या आधारे मिळकतींच्या नोंदी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम करणाºया सायबर टेक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाची फेरपडताळणी शहर व हद्दवाढ कर संकलन कार्यालयातर्फे करण्यात आली आहे. जीएसआयचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने जुन्याच पद्धतीच्या नोंदीवरुन मालमत्ता कराची बिले देण्यात आली आहेत. 

यानुसार वसुली घेण्यात येणार आहे. आॅनलाईन भरणा करणारांची यादी कर संकलन विभागाला देण्यात आली आहे. यामुळे आता थकबाकीदारांची यादी स्पष्ट झाली आहे. या यादीत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाºयांना नोटिसा देण्यात येणार असून त्यानंतर वसुलीसाठी घरोघरी जाण्याची भूमिका घेण्यात येणार आहे. 

वॉरंट व नोटीस फी लागू - थकबाकी वसूल होण्यासाठी यापूर्वी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी वॉरंट व नोटीस फी माफ करण्याची घोषणा केली होती. पण आता अशी कोणतीच सवलत मिळकतदारांना मिळणार नाही. त्यामुळे मिळकतदारांनी मार्चअखेरची वाट न पाहता तातडीने थकबाकी भरावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

५० हजारांहून अधिक रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहे. त्यांनी १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास वॉरंट बजावण्यात येईल. महापालिका प्रशासनाने यंदा वसुलीसाठी कडक धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे वेळेवर मालमत्ता कर भरावाच लागेल. - त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त, महापालिका. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका