शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

मुंबईचा बॉबी, मराठवड्यातला कुंदन अन् दक्षिणचा सारंग खरबूज भाव खातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 17:20 IST

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बºयांच गावातून खरबुजाचा पुरवठा होतो.दरवर्षी एप्रिल आणि मे मेहिन्यात दिवसाकाठी जवळपास २० टनाहून अधिक फळाची आवक होतेमागीलवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई आणि जिल्ह्यात अकलूज येथून बॉबी नावाचा पिवळा धमक खरबूजाची आवक

काशीनाथ वाघमारे

सोलापूर : उन्हाळ्यात शरिराला थंडावा देणाºया खरबुजाची जिल्ह्यात पाण्याअभावी अत्यल्प लागवड झाली आहे़ परिणामत: सोलापुरातील बाजार पेठेत मागील वर्षाच्या तुलनेत फळाची आवक घटली आहे. त्यामुळे भावही वधारला आहे. या काळात मुंबईतून आलेला बॉबी, मराठवडयातून येणारा कुंदन आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून फळबाजारात दाखल झालेल्या जवारी सारंग अशा विविध प्रकारच्या खरबुसांचा दर काहीअंशी वाढला आहे.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात बहुतांश फळांची आवक वाढलेली असते आणि भाव उतरलेले असतात. यंदा प्रथमच विहीर, बोअर अशा स्तोत्रांना पाणी कमी झाल्याने याचा परिणाम फळ लागवडीवर झाला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते सर्व प्रकारच्या पिकांमध्ये ऊस आणि पाणीदार फळांना पाणी अधिक प्रमाणात लागते़ यामुळे सोलापूर जिल्ह्यात यंदा खरबुजाची लागवड कमी झाली आहे़ परिणामत: मुंबई आणि मराठवाड्यातून या फळाची आवक झाली आहे़ मराठवाड्यात तुळजापूर येथून यंदा प्रथमच कुंदन खरबूज दाखल झाला आहे़ हाच माल जिल्ह्यातून सांगोला, मंगळवेढा, बोरामणी, वळसंग, अक्कलकोट, धोत्री येथूनही आणला गेला आहे. मागीलवर्षाप्रमाणे यंदाही मुंबई आणि जिल्ह्यात अकलूज येथून बॉबी नावाचा पिवळा धमक खरबूजाची आवक झाली आहे. सध्या बाजारात बºयापैकी उपलब्ध असलेला जवारी सारंग खरबूज दक्षिण सोलापूरमधून माळकवठे, भंडारकवठे आणि मंद्रूप येथून दाखल झाला आहे.-----दररोज केवळ ४ टन  खरबुजाची आवक जिल्ह्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बºयांच गावातून खरबुजाचा पुरवठा होतो. दरवर्षी एप्रिल आणि मे मेहिन्यात दिवसाकाठी जवळपास २० टनाहून अधिक फळाची आवक होते असते़ यंदा मात्र लागवडी अभावी केवळ ४ टनच मालाची आवक आहे़ जिल्ह्यात अजून १५ टन माल तुटवडा जाणवतोय. हिच स्थिती कायम राहिली तर आवक घटणार आहे आणि त्यांचे दरही वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तवली आहे़ ---लक्ष्मी मार्केटमधील शुक्रवारचे दर बॉबी खरबूज (१० ते ३० रुपये)कुंदन खरबूज (१० ते ६० रुपये)जवारी सारंग खरबूज (४० ते ६० रुपये)--------खरबूजसह अनेकप्रकारची फळं पाण्याअभावी जिल्ह्यात लागवड कमी झाली आहे़ त्यांची आवक घटली आहे़ सोलापूरचा व्यापारी आता मार्केट यार्डावर अवलंबून राहू शकत नाही़ काही व्यापारी पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद आणि कर्नाटकमधून फळं शोधून निर्यात करायचा विचार करतोय़ पाण्याचे संकट सर्वांपुढे असले तरी या काळात फळंही पुरवता आली पाहिजे़ अन्यथा व्यापारही चालणार नाही़ - फरिद शेखफळ विक्रेते 

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारTemperatureतापमानfruitsफळेAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती