शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या बारबालेशी तिसरे लग्न करण्याच्या तयारीत होते मुजाहिद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:47 IST

सोलापुरातील व्यापारी आत्महत्या प्रकरण : पनवेलच्या डान्सबारमध्ये झाली ओळख 

ठळक मुद्देपनवेल येथे फ्लॅट घेण्यासाठी ५0 लाख रूपये दे आणि दोन्ही बायका सोडून माझ्याशी लग्न कर, असा आग्रह बारबालेने मुजाहिद बागवान यांच्याकडे धरला होतापैसे दिले नाही तर आपल्या दोघांच्या संबंधाचे फोटो मी व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी बारबाला तानिया हिने दिली होती बारबालेच्या त्रासाला कंटाळूनच मुजाहिद बागवान याने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद पत्नी नाझनीन बागवान यांनी दिली

सोलापूर : घनिष्ठ मित्रासमवेत मुंबईतील पनवेलमध्ये असलेल्या डान्सबारमध्ये गेल्यानंतर आडती व्यापारी मुजाहिद बागवान यांची बारबालेशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तिच्याशी तिसरे लग्न करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र बारबालेच्या त्रासाला कंटाळून मुजाहिद बागवान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. 

मुजाहिद बागवान हे आडती व्यापारी होते़ ते मुंबईला गेल्यानंतर घनिष्ठ मित्रासमवेत पनवेल येथील डान्सबारमध्ये गेले. मित्राने प्रेयसीच्या बहिणीशी मुजाहिद बागवान यांची ओळख करून देण्यात आली. कालांतराने बारबाला तानिया आणि मुजाहिद बागवान यांच्यात संपर्क वाढत गेला. नंतर मुजाहिद बागवान हे सातत्याने पनवेल येथील डान्सबारला जाऊ लागले.

दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले़ मुजाहिद हे वारंवार मुंबईला चालल्याने त्यांच्या वडिलांना संशय आला. वडिलांनी मुजाहिद याच्या मित्राशी संपर्क साधून माहिती घेतली, तेव्हा ते पनवेल येथील डान्सबारमध्ये जात असतो, असे सांगितले.

वडिलांनी पत्ता काढून संबंधित बारबालेस सोलापूरला बोलावून घेतले़ ती आल्यानंतर तिची आणि त्यांची ओळख झाली. बारबाला तानिया नंतर सोलापूरलाही येऊ लागली होती. नंतर तानिया आणि मुजाहिद यांच्यात सातत्याने भांडणे होऊ लागली होती अशी माहिती प्रथमत: तपासात पुढे आली आहे़ अधिक तपास सुरू असल्याचे फौजदार रोहित दिवसे यांनी सांगितले़ 

धमकी दिल्याने मुजाहिद तणावात होते- पनवेल येथे फ्लॅट घेण्यासाठी ५0 लाख रूपये दे आणि दोन्ही बायका सोडून माझ्याशी लग्न कर, असा आग्रह बारबालेने मुजाहिद बागवान यांच्याकडे धरला होता. पैसे दिले नाही तर आपल्या दोघांच्या संबंधाचे फोटो मी व्हायरल करून तुझी बदनामी करेन अशी धमकी बारबाला तानिया हिने दिली होती. सतत हा तगादा लावल्याने मुजाहिद बागवान हे तणावात आले होते. बारबालेच्या त्रासाला कंटाळूनच मुजाहिद बागवान याने आत्महत्या केली आहे अशी फिर्याद पत्नी नाझनीन बागवान यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. 

बारबाला बांगला देशातील रहिवासी - पनवेल येथील डान्सबारमध्ये काम करणारी तानिया ही बांगला देशातील रहिवासी असल्याचे समजते. तिच्याशी संपर्क साधला असता, ती बांगला देशाची बॉर्डर क्रॉस करीत असल्याचे सांगत होती. तिचा तपास सुरू असून लवकरच तिला अटक केली जाईल अशी माहिती फौजदार रोहित दिवसे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसpanvelपनवेलbusinessव्यवसाय