शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महानायकाच्या कोरोनामुक्तीसाठी सोलापुरातील फॅन्सकडून मृत्यूंजय जप-महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:14 IST

अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण; दिर्घायुष्यासाठी चाहत्यांचे देवाला साकडे

ठळक मुद्देसोलापूरचे ज्युनिअर बच्चन म्हणून ओळखले जाणारे महादेव मादगुंडी यांनीही देवाकडे प्रार्थना केलीबच्चन यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे चाहते काळजीत पडले आहेतअनेक संकटांना पुुरुन उरणारे महानायक हे आतादेखील कोरोनाला हरवतील असा त्यांचा विश्वास आहे

सोलापूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर अनेक संकटे आली. काहीवेळा तर मृत्यूही त्यांच्यासमोर उभा होता. त्याच्यावरही अमिताभ बच्चन यांनी विजय मिळविला. आता त्यांना कोरोना झाला असला तरी त्यांच्यासमोर हे फार छोटे संकट आहे. यातून ते लगेच बरे होतील, असा विश्वास अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी बोलून दाखवला. बिग ‘बी’ कोरोनातून मुक्त व्हावेत, यासाठी महामृत्यूंजय मंत्राचा जपही फॅन्सनी केला.

बच्चन यांना कोरोना झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे चाहते काळजीत पडले आहेत. अनेक संकटांना पुुरुन उरणारे महानायक हे आतादेखील कोरोनाला हरवतील असा त्यांचा विश्वास आहे. अमिताभ बच्चन यांच्यामागे त्यांच्या चाहत्यांचे प्रेम असल्याने त्यांना काहीच होणार नाही, असे अमिताभ बच्चन फॅन फ्रेंडस् फॅन क्लबचे प्रदीप उमरजीकर यांनी सांगितले. त्यांच्या क्लबच्या २० सदस्यांनी मंदिरे बंद असल्याने घरी राहून देवाकडे अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली.

सोलापूरचे ज्युनिअर बच्चन म्हणून ओळखले जाणारे महादेव मादगुंडी यांनीही देवाकडे प्रार्थना केली. रविवार सकाळपासून ते मृत्यूंजय मंत्राचे पठण करत आहेत. सोलापूर बच्चन फॅन्स हा अमिताभ बच्चन यांचा फॅन क्लब आहे. या क्लबच्या माध्यमातून ते विविध उपक्रम घेत असतात. सध्या अमिताभ बच्चन हे  आजारी असल्याने त्यांच्या क्लबमधील सदस्यांनी आपापल्या घरी प्रार्थना केली. अमिताभ  यांच्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

अभिताभ यांच्या उत्तम आरोग्यासाठी उपासनामहानायक अमिताभ बच्चन व बच्चन परिवारातील सदस्य हे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी महाआरती करण्यात आली. विडी घरकूल येथे पद्मविभूषण महानायक डॉ. अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने इप्पाकायल यांच्या घरामध्ये श्रीलक्ष्मीनारायण व महेश्वर शंकर भगवान, आई तुळजाभवानी, मृत्युंजय महामुनी मार्कंडेय यांच्या चरणी वंदन करून महाआरती करण्यात आली. यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल,अंजन सज्जन, किशोर म्हेत्रे, गणेश सातालोलू, जगदीश इप्पाकायल इतर अमिताभप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याAmitabh Bachchanअमिताभ बच्चन