शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मृणालिनी फडणवीस यांनी घेतला सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:58 IST

नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली,

ठळक मुद्देप्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारलीया विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न असेल - फडणवीस

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून, संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठाचे नाव सदोदित उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केले.नूतन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रभारी कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही. बी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी. पी. पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, शैक्षणिक संकुलांचे संचालक आदी उपस्थित होते.कुलगुरू डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची धुरा सांभाळण्याची संधी मला लाभली, याचा मला मनापासून आनंद वाटतो. सोलापूर विद्यापीठ परीक्षाविषयक कामकाजात आघाडीवर आहे. यापुढच्या काळात या विद्यापीठाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रामुख्याने पदवी स्तरापासून विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे विशेष लक्ष द्यावे, यावर माझा कटाक्ष असणार आहे. विद्यापीठातील सर्व विभागांना भेटी देऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्या अडचणी सोडविणे याकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुसाकडून मिळणाºया निधीचा चांगला उपयोग करून विद्यापीठाच्या सर्वच संकुलांच्या विकासाला गती देणे, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणे, नॅकद्वारे विद्यापीठास अ दर्जा मिळविणे आदी आपले संकल्प असल्याचेही कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या.याप्रसंगी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, जवळपास पाच महिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियमित कार्यभार सांभाळण्याबरोबरच पाच महिन्यांसाठी सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची संधी मला मिळाली. सोलापूर  विद्यापीठ आणि आमच्या विद्यापीठात सामंजस्य करार केलेला आहे, याद्वारे या दोन विद्यापीठांचे परस्पर सहकार्य आणखी वाढावे. या विद्यापीठाची काही कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे, राहिलेली कामे नव्या कुलगुरू समर्थपणे तडीस लावतील, असा विश्वास मला वाटतो. विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा त्यांना रोजगाराची संधी मिळेल अशाप्रकारचे अभ्यासक्रम असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरPune universityपुणे विद्यापीठ