शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण

By appasaheb.patil | Updated: November 3, 2023 16:10 IST

सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसाने शेतकरी, जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत तर पेरण्या झालेल्या पिकांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

सोलापूर जिल्हा हा प्रमुख कृषी उत्पादक म्हणून प्रसिध्द आहे. विशेषतः डाळिंब, केळी , द्राक्षे इ. फलोत्पादनाचे वाढते उत्पादन लक्षात घेता सोलापूर हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खरीप आणि रबी हंगामातील पिकांचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.  परंतु, चालू वर्षी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यात सरासरी ही पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांची परिस्थिती उत्तम नसल्याने पाण्याअभावी पिके जळून जात आहेत.

दरम्यान, येणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. उजनी धरणाच्या जलसाठ्यात ही वाढ नसल्याने सिंचनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेषतः मोठ्या संख्येने असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी अधिक संकटग्रस्त झाला आहे. तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे ही संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे. त्यामुळे  या मागणीचा विचार करून सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSolapurसोलापूर