मोटारसायकल अपघातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:41+5:302021-09-15T04:27:41+5:30

पेनूरजवळ युवक ठार लोकमत न्यूज नेटवर्क मोहोळ : पेनूरकडे निघालेल्या मोटारसायकलला वाहनाची धडक बसून एक जन् जागीच ठार झाला ...

In a motorcycle accident | मोटारसायकल अपघातात

मोटारसायकल अपघातात

Next

पेनूरजवळ युवक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

मोहोळ : पेनूरकडे निघालेल्या मोटारसायकलला वाहनाची धडक बसून एक जन् जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पोखरापूर हद्दीत दळवे-पाटील वस्तीजवळ घडली.

मोहोळ पोलिसांच्या माहितीनुसार पेनूर येथील नीलेश आनंदा चवरे (वय २५) व कुरूल येथील रमेश अशोक पाटकर (वय २२) हे दोघे तुळजापूरहून पेनूरकडे मोटारसायकल (क्र. एमएच १३ डीके ४२११) वरून जात होते. दरम्यान, दळवे पाटील वस्तीजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात नीलेश आनंदा चवरे हा जागीच ठार झाला, तर रमेश अशोक पाटकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी सोलापुरातील हॉस्पिटलला पाठविण्यात आले. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. अधिक तपास साहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Web Title: In a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.