शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सासू-सुनेने पारंपरिक तणावाचं नातं माय-लेकीच्या प्रेमळ नात्यात परावर्तित केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:48 IST

सासू-सुनेच्या पांढऱ्या कपाळावर कर्तृत्वाची ललाटरेषा

प्रसाद पाटीलपानगाव : घरातील पिता-पुत्राच्या अकाली निधनानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र, हे दु:ख पेलत कापसेवाडी (ता. माढा) येथील सासू-सुनेने पारंपरिक तणावाचं नातं माय-लेकीच्या प्रेमळ नात्यात परावर्तित केलं. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात परिस्थितीला मात देत प्रगती साधली. चार एकर द्राक्षबागेसह बेदाणा व्यवसाय यशस्वी करून दाखविला.

संगीता अभिमान घोगरे (सासू), कल्पना लक्ष्मण घोगरे (सून) याच त्या जिद्दी सासू-सुना आहेत. कापसेवाडीतील अभिमान घोगरे व संगीता घोगरे या दाम्पत्याचे चौकोनी कुटुंब, मुलगा लक्ष्मण आणि सून कल्पना यांनी कष्टानं स्वमालकीच्या सहा एकराचे नंदनवन केले. वाढवत वाढवत तीन एकर द्राक्षबाग झाली. बाजारभावाच्या अनिश्चिततेने रस्त्यालगतच्या अर्ध्या एकरात एक बेदाणा शेड उभारले. कष्टाचं फळ मिळू लागले. कष्टानं दिवस जात होता. लक्ष्मण-कल्पना यांच्या संसारवेलीवर फुललेल्या रिया आणि सार्थक या नातवंडांसोबत दंगा करण्यात श्रमपरिहार होऊन रात्र आनंदात जात होती. मात्र, अचानक घात झाला अन् ऑक्टोबर २०१७ मध्ये बेदाणा शेड परिसरातच विजेच्या धक्क्याने लक्ष्मणचा मृत्यू  झाला. हसत्या-खेळत्या घरातला कर्ता पुरुष निघून गेला.  कष्टाने उभा केलेला प्रपंचाचा डोलारा, सून, लहानगी नातवंड  सांभाळायची कशी? पण अभिमान आणि संगीता यांनी उतारवयातही बळ वाढवले.   दु:खाला पाठीशी टाकले आणि हळूवारपणे सर्व गोष्टी हाताळत पुन्हा गाडी रुळावर आणली.

पण क्रूर नियतीला हे मान्यच नव्हतं.  अर्धांगवायू होऊनही अभिमान कुटुंबासाठी कष्ट घेत होते, पण ऑगस्ट २०१९ मध्ये माढा रोडवर अपघातात त्यांचेही निधन झालं. कुटुंबातील कर्ता पुरुषच उरला नाही. या सासू-सुनेसमोर मोठे संकट आले. दोघींनीही बळ बांधले, दु:ख  सावरले, कंबर कसली, सर्वच कामाची जबाबदारी आता दोघींवर होती. बागांची औषधे आणून बागेतील कामासाठीच्या कुशल मजुरांचे व्यवस्थापन करणे या बाबी  सासूंनी उचलल्या, तर ट्रॅक्टर शिकून बागेतील मशागत, फवारण्या या जबाबदाऱ्या  सुनेने उचलल्या. शिवाय मुलांच्या शिक्षणाकडेही दोघींनी लक्ष दिले.

शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय व शिवणकाम ही जबाबदारी पार पाडताना यासाठी गावकऱ्यांची सहानुभूती, नातेवाईकांची मदत आणि मानसिक आधार मिळत आहे. त्यामुळे आम्ही हरलो नाही.-कल्पना घोगरे

 

टॅग्स :SolapurसोलापूरWomen's Day Specialजागतिक महिला दिनagricultureशेती