शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

 १० जूनपासून होणार मान्सूनची सुरुवात; जुलै, ऑगस्टमध्ये सोलापुरात समाधानकारक पाऊस

By appasaheb.patil | Updated: April 6, 2024 19:27 IST

हा अंदाज सोलापुरातील प्रसिध्द पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर : यंदाच्या वर्षी केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. महाराष्ट्रात १० जूनपासून मान्सूनची सुरुवात होईल. विशेषतः जुलै, ऑगस्टमध्ये सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात पाऊस समाधानकारक होईल. एकंदरीत सरासरीइतका किंवा थोडा अधिक पाऊस होईल, असा अंदाज सोलापुरातील प्रसिध्द पंचांगकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केला आहे.

मागील वर्षी सोलापूर शहरासोबत जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने सध्या जिल्ह्यातील उजनी धरणासह औज, हिप्परगा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघू व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गाठला आहे. त्यामुळे सोलापूर शहरात सहा दिवसांआड तर ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती उजनी धरणात वजा ३७.०९ टक्के, तर सात मध्यम प्रकल्पांत १०.९९ टक्के, ५६ लघुप्रकल्पांत २.६८ टक्के, तर ९० कोल्हापूर बंधाऱ्यात १८.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. धरणे, विहिरी, नद्या, नाले, बंधारे कोरडे पडू लागल्याने सोलापूरकरांना मोठ्या पावसाची आशा लागून राहिली आहे. यंदा तरी समाधानकारक पाऊस पडेल, असा दिलासादायक अंदाज दाते यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत गुरुपुष्यामृत योगसप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण ३ गुरुपुष्यामृत योग आहेत. या वर्षी ६ मे ते २५ जून शुक्राचा अस्त असून, ८ मे ते १ जून या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे ८ मे ते १ जून या कालावधीत एकत्रितपणे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने कोणत्याही मंगल कार्याकरिता मुहूर्त नाहीत. २९ मार्च २०२५ पर्यंत शनी कुंभ राशीत असणार असून मकर, कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती आहे. या वर्षी ज्येष्ठ महिन्यात २५ जून रोजी अंगारकी चतुर्थीचा योग आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर