शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गल्लीबोळातले सावकार ‘खाकी’च्या रडारवर; पडद्यामागच्या ‘फायनान्सर’चा जीव खालीवर ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:51 IST

खरे सूत्रधार शोधून काढा : पोलिसांना सोलापूरकरांचे आवाहन; हे तर केवळ हिमनग

ठळक मुद्देडान्सबारचालक अमोल जगताप आत्महत्या प्रकरणानंतर शहरातील अवैध सावकारी धंद्याचे पितळ उघडेछोट्या-मोठ्या सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरवणाºया ‘फायनान्सर’ मंडळींचा पर्दाफाश

सोलापूर : डान्सबारचालक अमोल जगताप आत्महत्या प्रकरणानंतर शहरातील अवैध सावकारी धंद्याचे पितळ उघडे पडत चालले आहे. गल्लीबोळातील काही सावकारांवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र, या छोट्या-मोठ्या सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरवणाºया ‘फायनान्सर’ मंडळींचा पर्दाफाश केला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कधी काळी पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी काही मंडळी एका झटक्यात लाखो रुपये कर्जाने कसे काय देऊ शकतात, याचाही शोध घेण्याची वेळ आता पोलिसांवर आली आहे. या छोट्या-मोठ्या सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरवणारे फायनान्सर आजही समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठितपणाचा आव आणून फिरत आहेत. या लोकांनाही प्रशासनाने रडारवर घेणे गरजेचे आहे. 

मंगळवारी उपनिबंधक कार्यालयाने १० सावकारांच्या घरांवर, कार्यालयांवर धाड टाकल्यानंतर बुधवारी तीन सावकारांवर गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या तीन सावकारांकडील कोरे धनादेश, स्टँप आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. दत्तात्रय मादगुंडी (वय ६५, रा. सोलापूर) या ज्येष्ठ नागरिकाने व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या त्रासाबद्दल दहा लोकांची  यादी तयार करुन शहर उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची दखल घेत शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार केली होती. 

पथकाने विडी घरकूल परिसरातील सात सावकारांच्या घरी धाडी टाकल्या. या भागातील दोन सावकारांच्या घरात धनादेश, कोरे धनादेश, स्टॅम्प आदी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. त्या दोन्ही सावकारांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मोदी स्मशानभूमीजवळील सोनी नगरात एकाच सावकाराच्या घरावर धाड टाकण्यात आली. दमाणी नगर व रामलाल चौकातील दोन सावकारांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. यापैकी एका सावकाराविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्रस्त कर्जदार येताहेत पुढे...जुना पुणे नाका येथील हांडे प्लॉट परिसरातील गुरुकृपा या बिल्डिंंगमध्ये दि. १३ जुलै रोजी हॉटेल गॅलेक्सीचे मालक अमोल जगताप यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील नागरिकांना सावकारांविरुद्ध तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. यानुसार दत्तात्रय मादगुंडी या ज्येष्ठ नागरिकाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल दहा सावकारांविरुद्ध शहर उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोक हळूहळू सावकारांविरुद्ध तक्रारी देण्यास पुढे येत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस