भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्षाविरुध्द सावकारकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:36+5:302021-03-07T04:20:36+5:30

पंढरपूर : भाजपा युवा मोर्चाचे माजी पंढरपूर शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव (रा. संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द अवैध सावकारीचा गुन्हा दाखल ...

Money laundering case against former BJP Yuva Morcha city president | भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्षाविरुध्द सावकारकीचा गुन्हा

भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्षाविरुध्द सावकारकीचा गुन्हा

Next

पंढरपूर : भाजपा युवा मोर्चाचे माजी पंढरपूर शहराध्यक्ष विदुल पांडुरंग अधटराव (रा. संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशोब वह्या, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅक पासबुकांसह रोख रक्कम २९ हजार ३४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

विदुल पांडुरंग अधटराव यांच्याविरुध्द खासगी सावकाराची तक्रार पोलीस ठाण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या घरी तपासणी केली. या तपासणीत प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-१ रा. सहा. निबधंक सहकारी संस्था) यांच्या समक्ष पोलिसांनी दस्तऐवजासह रोख रक्कम जप्त केली आहे. विदुल पांडुरंग अधटराव खाजगी सावकार व त्याचे अन्य साथीदार यांचा शोध घेवून त्यांच्याकडेही अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यांच्याकडून आणखीन अशाच प्रकारचे अवैध सावकारकीचे प्रकार घडले असण्याची अथवा घडत असण्याची शक्यता आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १३५/२०२१ महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ सह भा.दं.वि.कलम ५०६ प्रमाणे विदुल पांडुरंग अधटराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, नीता डोकडे यांनी केली.

Web Title: Money laundering case against former BJP Yuva Morcha city president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.