शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गौरींच्या आगमनाचा मुहूर्त मंगळवारी दुपारी; विसर्जनही गुरूवारी दुपारी मूळ नक्षत्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:22 IST

बाजारपेठेत खरेदीची लगबग : विविध धातू अन् प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे उपलब्ध

ठळक मुद्देगौरीचे आवाहन मंगळवारी दुपारी १.५९ नंतर अनुराधा नक्षत्रावरबुधवारी गौरी पूजन असून, मूळ नक्षत्रावर गुरूवारी दुपारी १२.३७ नंतर विसर्जन करावेगौरीचे मुखवटे, पूजचे साहित्य खरेदी करण्यासाठी आज दिवसभर मधला मारूती परिसरात महिलांची गर्दी

सोलापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे २२ आॅगस्ट रोजी आगमन झाल्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे मंगळवार दि. २५ आॅगस्ट रोजी गौरींचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी घरोघरी तयारी सुरू असून, गौरीचे आवाहन मंगळवारी दुपारी १.५९ नंतर अनुराधा नक्षत्रावर करावे. 

बुधवारी गौरी पूजन असून, मूळ नक्षत्रावर गुरूवारी दुपारी १२.३७ नंतर विसर्जन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. दरम्यान, गौरीचे मुखवटे, पूजचे साहित्य खरेदी करण्यासाठी आज दिवसभर मधला मारूती परिसरात महिलांची गर्दी दिसून आली.

दाते म्हणाले की, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ह असलेल्या दिवशी गौरी पूजन करावे म्हणजेच बुधवार २६ रोजी नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे आहे. गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते. मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे, त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल, असेही दाते यांनी सांगितले़ ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळा गौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते. श्रावणात मंगळागौरीसाठी माहेरी आलेल्या सासुरवाशीणी गणपती आणि गौरी सणासाठी माहेरी येत असतात. या दिवसात प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. या सणाच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी, व्यवसायासाठी राहिलेले कुटुंब आपल्या मूळ गावी येऊन हा सण साजरा करतात.

८०० ते ३००० रुपयांपर्यंत मुखवटे...चालू वर्षी गौरींच्या मुखवट्यात सर्वाधिक मागणी शाडूच्या मुखवट्यांना असल्याचे दिसून येत आहे़ गौरींचे अखंड स्टँड (हिंडालियम बॉडी) बाजारात उपलब्ध आहेत़ साडेचार हजारांपासून यांची किंमत असते. मात्र ग्राहकांचा कल अ‍ॅल्युमिनियम, फायबर, लोखंडी स्टँड खरेदी करण्याकडे आहे़ प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे २०० ते ४०० रुपये जोडी तर पितळी मुखवटे ८०० ते ३००० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत़ गौरी बसतात त्या मुहूर्तापर्यंत ग्राहक या सामानाची खरेदी करतात, असेही दुकानदार संग्राम यादव यांनी सांगितले़ 

बाजारपेठेत महिलांची गर्दीगौरी-गणपती उत्सव जवळ आल्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठा गौरींचे मुखवटे व शृंगार साहित्याने सजल्या आहेत़ यावर्षी नवनवीन प्रकारातील गौरींचे मुखवटे उपलब्ध आहेत. सोलापूर शहरातील नवीपेठ, टिळक चौक, जोडबसवण्णा चौक, कुंभार वेस, जुळे सोलापूर, कन्ना चौक, अशोक चौक आदी ठिकाणच्या मुख्य बाजारपेठांत साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे.

सजावटीचे साहित्य गौरींना बसविण्यासाठी आकर्षक मखरांना प्राधान्य दिले जाते. यंदा तयार मखरांबरोबरच घरी आपल्या आवडीनुसार मखर तयार करता यावेत, यासाठी साहित्यांची उपलब्धता विक्रेत्यांनी करून दिली आहे. स्पंजचे खांब, कापडी फुले, अशा विविध प्रकारच्या साहित्यांचा यात समावेश आहे. फराळाबाबतही असेच चित्र असून, फराळाचे साहित्य आणि तयार पदार्थ दोन्ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. आपापल्या सोईने, आर्थिक बाजूचा विचार करून खरेदीस प्राधान्य दिले जात आहे. गौराईसाठी १०० रुपयांपासून १५ हजारांच्या पुढे विविध प्रकारच्या साड्या बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये जरी वर्क, टिकली वर्क, स्पार्कल वर्क, एम्ब्रॉयडरी, सिल्क बांधणी, पैठणीमध्ये नारायणी पैठणी, अपूर्वा सिल्क, चेन्नई सिल्क, इचलकरंजी पैठणी अशा हजारो प्रकारच्या विविध रंगी मनाला मोहून टाकणाºया साड्या गौरींसाठी बाजारात उपलब्ध आहेत़ सिल्क बांधणी, पैठणी, टिकली वर्क या साड्यांना अधिक मागणी महिला वर्गाकडून होत असल्याचे दिसून येत आहे़ याशिवाय दागिन्यांचीही खरेदी जोमाने सुरू  आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवMarketबाजार