शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

माउली धावली सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 10:19 IST

सांगली पूरग्रस्तांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने पाठविल्या पाच हजार साड्या

ठळक मुद्दे- श्री रुक्मिणी मातेस अनेक महिला भाविक मोठ्या श्रद्धेने साडी-चोळी अर्पण करत असतातश्री रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या ५ हजार साड्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला

पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त महिलांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने ५ हजार साड्यांची मदत पाठविण्यात आली आहे. यामुळे पूरग्रस्त महिलांच्या मदतीला माउली धावली असल्याचे दिसून आले.

सांगली जिल्ह्यामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी आहे. यामुळे सांगलीतील नागरिकांना कपडे, राहणे व जेवण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, हभप. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व महिला सदस्या शकुंतला नडगिरे, अ‍ॅड. माधवी निगडे व साधना भोसले यांनी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना सांगलीतील पूरग्रस्त महिलांसाठी मदत म्हणून साड्या पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या साड्याचा टेम्पो सांगलीकडे मार्गस्थ झाला. त्याप्रसंगी मंदिरे समिती सदस्य शकुंतला नडगिरे, हभप जळगावकर महाराज, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या साड्या- श्री रुक्मिणी मातेस अनेक महिला भाविक मोठ्या श्रद्धेने साडी-चोळी अर्पण करत असतात. यामुळे मंदिरे समितीकडे महिन्याला हजारो साड्यांचा साठा होतो. श्री रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या ५ हजार साड्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्या साड्या टेम्पोतून पाठविल्याचे मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSangli Floodसांगली पूर