शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार लपविण्यासाठीच मोहिते-पाटलांनी केला भाजपात प्रवेश;  मनोहर सपाटे याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 13:15 IST

सोलापूर : माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यास सोलापुरातून केवळ दोघांनी ...

ठळक मुद्देऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाममुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्यावर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघडपणे चुळबूळ सुरू झाली

सोलापूर : माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यास सोलापुरातून केवळ दोघांनी पक्षत्याग केल्याची माहिती पुढे येत आहे.   दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर संस्थांमधील घोटाळा लपविण्यासाठीच मोहिते-पाटलांनी राष्टÑवादी सोडून भाजपात प्रवेश केल्याचा आरोप राष्टÑवादीचे प्रवक्ते मनोहर सपाटे यांनी केला.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम दिसून येत आहे. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह यांनी बुधवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केल्यावर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघडपणे चुळबूळ सुरू झाली आहे. याबाबत पदाधिकाºयांची मते जाणून घेतली. 

शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदांचा अद्याप कोणी राजीनामा दिलेला नाही किंवा इतर पक्षात जाण्याबाबत कोणीही कळविलेले नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांचेच आपण निष्ठावंत असल्याचे माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महापालिकेतील गटनेते किसन जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव सायरा शेख यांनी म्हटले आहे.

शहरातून माजी महापौर प्रवीण डोंगरे व किरण पवार हे दोघे भाजपमध्ये गेल्याचे समजले असल्याचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. अकलूजच्या बैठकीदरम्यानच शहरातील पदाधिकाºयांची बैठक झाली. मात्र पक्षाच्या बैठकीला अल्पसंख्याक सेलचे राजू कुरेशी, फारुक मटके उपस्थित नव्हते. 

झेडपीच्या राजकारणावर परिणाम- जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे तर भाजप सदस्याच्या पाठिंब्यावर सध्याचे पदाधिकारी मंडळ अस्तित्वात आहे. पण याचा भाजपला काहीच उपयोग नसल्याची तक्रार आहे. खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत विचार करावा लागेल असा इशारा दिला  होता. आता मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात झेडपीचे सूत्रधार बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.  झेडपीचे अध्यक्ष  संजय शिंदे यांनी राष्टÑवादीकडून निवडणूक लढविल्यास अडचण वाढणार आहे.

शहराच्या राजकारणात मोहिते-पाटील गट म्हणून काम केले आहे. त्यामुळे रणजितसिंह यांच्याबरोबर राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला असून शहराध्यक्षाला कल्पना दिली आहे. माझ्याबरोबर राजा शेख, शफी इनामदार, राजू सुपाते उपस्थित होते.- प्रवीण डोंगरे, माजी उपमहापौर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास मिळत आहेत. मी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करीत आहे. सोलापूर लोकसभेचे आघाडीचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ३० वर्षांत प्रथमच भेट घेतली.- विष्णू निकंबे, माजी उपमहापौर

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील