शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मोहिते-पाटलांची कलई केलेली भांडी निवडणुकीत चकाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 3:27 PM

पण तुमची भांडी चायनीज का सिंगापूरची ?.. हे कळाले नाही; धैर्यशील मोहिते-पाटील याचा सवाल

ठळक मुद्दे- रोपळे येथे विविध विकास कामांचे उदघाटन- आमदार नारायण पाटील यांनी केली संजय शिंदे याच्यावर टिका- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे लागले वेध

लऊळ : लोकसभेच्या निवडणुकीत ‘आमची कलई केलेली भांडी लोकांनी स्वीकारल्याने ती चकाकली. मोहिते-पाटलांची भांडी गोरगरिबांच्या कामी येतात. पण ज्यांना ही भांडी कलई केलेली वाटली, त्यांची भांडी चायनाची का, सिंगापूरची आहेत, हेच आम्हाला अद्यापपर्यंत समजले नाही. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व त्याप्रमाणे वागतो. लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरसमधून लाखाचे लीड देऊ, सांगून तो देऊनही दाखविल्याचे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.

माढा तालुक्यातील रोपळे क. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रथम ओढा सरळीकरण, महादेव मंदिर काँक्रीटीकरण, खाजा खलील भक्त निवास अशा गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन धैर्यशील मोहिते-पाटील, आ. नारायण पाटील व झेडपीचे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बी. डी. पाटील, लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य व्यंकटेश पाटील, शशिकांत माळी, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, तालुकाध्यक्ष इंद्रजित आदलिंगे, कुर्डूवाडी शिवसेना शहराध्यक्ष समाधान दास, राज ढेरे, प्रवीण सोमासे, उपसरपंच बिरुदेव पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद पाटील, तानाजी दास, नागनाथ मेहर, श्रीपाद दळवी, अशोक मेहर, जिजाबा कांबळे, आनंद गोडगे, अतुल दास उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.

संजय शिंदेंचे पाय जमिनीवर नाहीतमोहिते-पाटील म्हणजे स्लो पॉयझन आहे. ते कधी चढेल ते सांगता येत नाही. ते कोणाच्या नादी लागत नाहीत आणि नादी लागले तर ते सोडतही नाहीत. संजय शिंदे यांचे पाय जमिनीवर नाहीत. त्यांना सर्वसामान्यांचे काही देणे-घेणे नाही. कारखानदारी असल्याने त्यांना गोरगरीब जनता दिसत नाही, अशी टीका आ. नारायण पाटील यांनी केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकPoliticsराजकारणNarayan Patilनारायण पाटीलVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील