शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Good News; पुण्यात चालणारे मोक्का न्यायालय आता सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 13:03 IST

अकरा सरकारी वकिलांची नियुक्ती; सोलापूर, पंढरपूर, बार्शी, माळशिरस येथे कामकाज

ठळक मुद्देजिल्ह्यातील मोक्का अंतर्गत सुमारे ३० खटले पुणे येथील मोक्का न्यायालयांमध्ये सुरू होतेसोलापुरात सात मोक्का न्यायालये सुरू झाल्यामुळे तेथील सुमारे तीस खटले वर्ग करण्यात आलेमोक्का न्यायालयासाठी प्रमुख विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली

संताजी शिंदे

सोलापूर : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत चालणारे न्यायालय आता सोलापुरात सुरू झाले आहे. पूर्वी पुणे येथे मोक्का न्यायालय चालत होते, मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हानिहाय मोक्का न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, माळशिरस याठिकाणी एकूण सात न्यायालये चालणार आहेत. यासाठी एकूण अकरा सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची सुनावणी पुणे येथील मोक्का न्यायालयात होत होती. मागील महिन्यात महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हानिहाय मोक्का न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. सोलापुरातील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २, बार्शी येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २, पंढरपूर  येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ व २ तर माळशिरस येथे जिल्हा व  सत्र न्यायाधीश क्र. १ अशी एकूण  सात मोक्का न्यायालये चालणार आहेत. 

नियुक्त करण्यात आलेले वकील...मोक्का न्यायालयासाठी प्रमुख विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूरसाठी अ‍ॅड. शैलजा क्यातम, अ‍ॅड. माधुरी देशपांडे, बार्शीसाठी अ‍ॅड. प्रदीप बोचरे, अ‍ॅड. दिनेश देशमुख, अ‍ॅड. श्याम झाल्टे, पंढरपूरसाठी अ‍ॅड. वांगीकर, अ‍ॅड. शांतीकुमार दुलंगे, अ‍ॅड. आनंद कुर्डूकर, माळशिरससाठी अ‍ॅड. संग्राम पाटील, अ‍ॅड. शांतिनाथ मेंढेगिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुणे येथे चालणारे ३० खटले सोलापूरच्या मोक्का न्यायालयाकडे वर्ग

जिल्ह्यातील मोक्का अंतर्गत सुमारे ३० खटले पुणे येथील मोक्का न्यायालयांमध्ये सुरू होते. सोलापुरात सात मोक्का न्यायालये सुरू झाल्यामुळे तेथील सुमारे तीस खटले वर्ग करण्यात आले आहेत. मोक्का लावायचा असेल तर संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलीस महासंचालकांची परवानगी घ्यावी लागते. 

पूर्वी पुणे येथे चालणारे मोक्का न्यायालय आता सोलापुरात आल्याने शहर व जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा बसेल. जिल्ह्यातील चार ठिकाणी एकूण सात न्यायालये चालणार आहेत. त्यामुळे मोक्का अंतर्गत खटल्यांना गती मिळेल. आरोपींवर कडक कारवाई होईल.- अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूतजिल्हा सरकारी वकील, सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय