शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादक अडचणीत; गाईच्या दूध खरेदी दरात पुन्हा दोन रुपयांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:32 IST

गो-पालकांना मिळणार प्रतिलिटरला १८ रुपये; राज्यातील शेतकºयांची अडचणीत

ठळक मुद्देराज्यात दररोज गाईचे दूध एक कोटी १० लाख लिटरच्या दरम्यान संकलन होतेकोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान जनावरे सांभाळून कुटुंबाची उपजीविका करणारे शेतकरी आता अडचणीत आले

सोलापूर : सहकारी व खासगी दूध संघांनी गाईच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे मागील महिन्यात कसाबसा लिटरला २० मिळणारा दरही आता १८ रुपयांवर आला आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर तर राज्य शासनाने दूध उत्पादकांना वाºयावर सोडल्याचे दिसत आहे.

राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहमदनगर या जिल्ह्यात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. 

राज्यात दररोज गाईचे दूध एक कोटी १० लाख लिटरच्या दरम्यान संकलन होते. यामध्ये या सहा जिल्ह्यातील ८० ते ९० लाख लिटर दूध असते. या जिल्ह्यातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरे सांभाळून कुटुंबाची उपजीविका करणारे शेतकरी आता अडचणीत आले आहेत. कारण गेल्या चार महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. कोरोनाची संचारबंदी उठल्यानंतर व्यवहार सुरळीत चालल्यानंतर तरी शेतीमाल व दुधाला दरवाढ मिळेल या अपेक्षेवर शेतकरी बसले होते; मात्र  काल-परवा खासगी व सहकारी दूध संघांनी काढलेल्या दरपत्रांनी शेतकºयांना घाम फुटला आहे. पश्चिम महाराष्ट्रात इंदापूर येथील सोनाई हा खासगी संघ सर्वाधिक दूध संकलन करणारा संघ आहे. 

या सोनाई संघाने ७ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या दरपत्रकात ३.५/८.५ प्रकारच्या दुधाला वाहतूक व कमिशनसह प्रतिलिटरला १९ रुपये ५० पैसे दर देणार असल्याचे म्हटले आहे. तर ३.५/८.४ प्रकारच्या दुधाला १९ रुपये २० पैसे दर जाहीर केला आहे. म्हणजे शेतकºयांना एका लिटरला १७ रुपये किंवा १७ रुपये ५० पैसे मिळणार आहेत. 

गोविंद मिल्कने थेट ३.५/८.५ प्रकारच्या दुधाला प्रतिलिटरला १८ रुपये मिळतील असे जाहीर केले आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ३.५/८.५ प्रतिच्या दुधाला १९ रुपये व ३.५ / ८.५ प्रतिच्या दुधाला १८ रुपये ७० पैसे दर जाहीर केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धोरण विचारण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पोहोच दुधाला २०.५० पैसे दरसोनाई दूध उत्पादक संघाने सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मेल पाठवून टँकरद्वारे पोहोच केलेल्या दुधाला प्रतिलिटर २० रुपये ५० पैसे असा दर मिळेल असे कळविले आहे. संघाला संकलन व वाहतुकीसाठी एक ते दीड रुपये खर्च येतो. सोलापूर जिल्हा दूध संघाचे सध्या ५० ते ५५ हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. या दुधाचे काय करायचे?, हा दूध पंढरीसमोर प्रश्न असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

सरकार मदत करीत नाही. अन्य दूध व दुग्धजन्य पदार्थ विकत नाहीत. दूध व्यवसाय जाम झाला आहे. दर कमी केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने अनुदान दिले तरच दूध घेणे परवडणार आहे. राज्यातील सर्वच दूध उत्पादक संघांनी खरेदी दर कमी केले आहेत.- दशरथ मानेसोनाई दूध संघ, इंदापूर

आमच्या सरकारने दूध दर कमी झाल्यानंतर सर्वच दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन शेतकºयांना मदत केली होती. या सरकारने सुरू केलेल्या अनुदान योजनेचा फायदा केवळ मंत्री व त्यांच्या नातलगांना झाला. ती योजनाही बंद झाली.- सदाभाऊ खोत माजी मंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठाmilkदूधSadabhau Khotसदाभाउ खोत