शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पोलीस चौकीचे होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:41 IST

खासदारांचा पुढाकार; शहर पोलीस, महापालिकेसह रेल्वेच्या अधिकाºयांची लवकरच बैठक

ठळक मुद्देभारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे स्थानकलवकरच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक होणार

सुजल पाटील

सोलापूर : भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्यासोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेला बाधा ठरणाºया रेल्वे पोलीस चौकीचे स्थलांतर होणार आहे़ यासाठी लवकरच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या विशेष योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे विस्तारीकरण, प्रवेशद्वारासमोर आकर्षक पोर्च,  वाहन पार्किंगसाठी व्यवस्था,  रिक्षा थांबविण्यासाठी रकाने,  प्रवेशद्वारासमोर बागबगीचा आदी विकासकामे करण्यात आली़ त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली असून सोलापूर रेल्वे स्थानक देशातील सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे़ अशात स्थानकाच्या डाव्या बाजूला असलेल्या आरक्षण केंद्रासमोरील रेल्वे पोलीस चौकी स्थानकाच्या सुंदरतेला बाधा आणत असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आले.

दरम्यान,  चौकीसमोर होणारी गाड्यांची गर्दी, सातत्याने होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे रेल्वे प्रशासनाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेली रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार रेल्वे प्रशासनाने महापालिका व शहर पोलीस आयुक्तालयास पत्रव्यवहार करून त्वरित स्थलांतर करून रेल्वेच्या जागेत नवी पोलीस चौकी स्थापन करावी अशी विनंती केली़ दरम्यान, महापालिका आयुक्त दीपक तावरे हे कार्यक्रमासाठी रेल्वे स्थानक परिसरात आले असता त्यांनी रेल्वे पोलीस चौकी परिसराची पाहणी केली़  त्यावेळी त्यांनीही चौकी स्थलांतर करण्यासाठी महापालिका सहकार्य करेल असे सांगितले होते; मात्र मागील काही दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागत नव्हता़ मंगळवारी सोलापूरचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी रेल्वेच्या अधिकाºयांसोबत रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत बैठक घेतली़ त्या बैठकीत रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदार महास्वामी यांना सांगितले़ त्यावेळी महास्वामी यांनी लवकरच सोलापूर महापालिका, शहर पोलीस आयुक्तालय व रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले़ 

जागा अन् बांधून देण्याची जबाबदारी रेल्वेचीच- रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलीस चौकीला रेल्वे स्थानक परिसरातच जागा देण्यात येणार आहे़ याशिवाय चौकीसाठीचे बांधकाम व उभारणीचा खर्चही रेल्वे प्रशासन करणार आहे़ त्यासाठी सोलापूर महापालिका किंवा पोलीस आयुक्त कार्यालयास कोणत्याही प्रकारची व्यवस्था करावी लागणार नसल्याची माहिती माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल अधिकारी प्रदीप हिरडे यांनी दिली़

रेल्वेच्या विविध प्रश्नासंदर्भात परवाच रेल्वेच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली़ त्या बैठकीत रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याची अपेक्षा रेल्वेच्या अधिकाºयांनी माझ्यासमोर व्यक्त केली़ लवकरच पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व  रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेता येईल़ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी पोलीस चौकी असणे गरजेचेच आहे.- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस