शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:51 IST

आपण संतांच्या, सदगुरुंच्या वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती म्हणजे ज्यांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण नांदत आहेत तेथे साक्षात देवाची वस्ती असुन तोच देह देवाचे साक्षात घरच आहे आणि देवच वस्तीला आले म्हटल्यावर त्यांना सहजच आत्मरामाच्या स्वरुपाचा साक्षात्कार झाला आहे म्हणून त्यांना अवघ्या विश्वात एका आत्मरामा शिवाय दुसरे काहीच दिसत नाही. म्हणून आपण अज्ञानी जीवाने सुद्धा दया, क्षमा, शांती या गुणांचा अंगीकार करावा किंवा ज्यांच्या ठायी हे गुण आहेत त्यांची संगती करावी असा गुप्त रुपाने उपदेश करीत आहेत. एवढेच नाही तर निंदा, द्वेष, चेष्टा ज्या अभिमानाच्या संगतीने घडतात त्या अभिमाला भाजा म्हणजे जाळून टाका मग अभिमान गेला  तुका म्हणे देव झाला अशी अवस्था प्राप्त होईल. या करीता अभिमान सांडून किंवा सोडुन केशवाला भजा म्हणजे भगवंताचे अखंड प्रेमपुर्वक नामस्मरण, भजन करा. असा उपदेश करीत आहेत.

शेवटच्या चरणात महाराज सांगतात की आम्ही ( या निवृत्तीने ) सुद्धा सदगुरू कृपेने अभिमान रहित होऊन एकरुप चित्ताने भगवंताचे भजन केले आहे म्हणून अवघ्याच गुणदोषांना गिळून टाकले आहे म्हणजे गुणदोषांच्या पलिकडे असलेल्या किंवा दोषरहीत, गुणातीत असलेल्या पांडुरंग परमात्म्याला आपलेसे करुन अवीट आनंदाचा उपभोग घेत आहोत. आणि आपण इतरांनी सुद्धा याच ( संतांच्या, सदगुरुंच्या ) वाटेने जाऊन अवीट असा अपरिमित आनंद प्राप्त करुन घ्यावा. 

-  ह.भ.प. वसंत साठे महाराज,बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक