शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

साने गुरूजी जयंती विशेष; पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठात होणार साने गुरुजींचे स्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 10:52 IST

अन् मागासवर्गीयांना खुले झाले मंदिर; तत्कालीन सभापती मावळणकरांनी केली होती मध्यस्थी

ठळक मुद्देसाने गुरूजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मागासवर्गीयांना मिळावा यासाठी उपोषण करीत असताना राज्यभर जनजागृती केलीसहा दिवस उपोेषण झाल्यानंतर प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली होतीसनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारत हे आंदोलन यशस्वी झाले

सतीश बागल

पंढरपूर :  साने गुरूजी यांनी श्री विठ्ठल मंदिरात मागासवर्गीयांना प्रवेशासाठी दि. १ ते १० मे १९४६ साली सलग १० दिवस उपोषण केले. हे उपोषण म्हणजे परिवर्तनाची सुरूवात होती. या सानेगुरुजींचे ज्या ठिकाणी त्यांनी उपोषण केले तेथे आता स्मारक होणार आहे. साने गुरुजींच्या उपोषणासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचीदेखील मदत झाली. लोकसभेचे तत्कालीन सभापती मावळणकर यांनी पंढरीत येऊन यामध्ये यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतरच्या काळात सर्व जातींतील मंडळींना मंदिरातील प्रवेश खुला झाला. साने गुरूजींची जयंती साजरी होत असताना समानतेसाठी त्यांनी केलेले काम राज्यातील जनतेसाठी आजही प्रेरणादायी ठरत आहे. 

साने गुरूजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात मागासवर्गीयांना मिळावा यासाठी उपोषण करीत असताना राज्यभर जनजागृती केली होती. येथील स्टेशन रोडवरील संत तनपुरे महाराज मठात हे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या उपोषणाला जनमानसातून चांगला पाठिंबा मिळाला. सहा दिवस उपोेषण झाल्यानंतर प्र.के. अत्रे यांनी उपोषणस्थळी त्यांची भेट घेतली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने उपोषणाला पाठिंबा देत साने गुरूजींचे काही कमीजास्त झाल्यास त्याला सरकार जबाबदार असे सांगत सर्व बाजूंनी दबाव वाढविला होता. त्यानंतर त्यावेळी मंदिरात असणारे उत्पात तसेच बडवे यांनी मागासवर्गीय समाजास मंदिर प्रवेशास होकार दिला. त्यावेळी तत्कालीन आ. तात्यासाहेब डिंगरे तसेच इतर समाजसुधारक उपस्थित होते. श्री विठ्ठल मंदिरातील प्रवेशानंतर गावागावातील पाणवठ्यावर मागासवर्गीयांना पाणी भरता येईल, सर्वत्र समानता येईल, अशी साने गुरूजी यांची भावना होती.

सनातनी मंडळींकडून याला विरोध झाला होता. मात्र, हा विरोध झुगारत हे आंदोलन यशस्वी झाले. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती. साने गुरूजींविषयीची माहिती देताना नंदकुमार कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यात साने गुरूजी यांनी तुरूंगवास भोगला. अंमळनेर येथे काही दिवस नोकरी केली. सुसंस्कारित पिढी घडावी यासाठी शामची आई या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली. आईचं अंतकरण असणाºया साने गुरूजी यांनी समाजात समानता यावी, सर्वधर्मसमभाव निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. 

संत तनपुरे मठ क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार- साने गुरूजी यांनी मागासवर्गीयांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी संत तनपुरे महाराज मठातील चारोधाम मंडपात दहा दिवस उपोषण केले. ज्या ठिकाणी उपोषण केले, त्याठिकाणी साने गुरूजी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे येथील बालविकास मंडळ तसेच इतर संस्थांकडून प्रस्ताव आला असल्याचे ह.भ.प. बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले. संत तनपुरे महाराज मठ अनेक क्रांतिकारी घटनांचा साक्षीदार आहे. शेतकरी कामगार पक्षाची स्थापना याच ठिकाणी झाली. तत्कालीन राष्टÑपती राजेंद्र प्रसाद तसेच प्रतिभाताई पाटील यांनी याठिकाणी भेट दिली आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना याठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरSane Gurujiसाने गुरुजी