शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

By विठ्ठल खेळगी | Published: March 17, 2024 3:16 PM

या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

विठ्ठल खेळगीसोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या हालचाली वाढल्या आहेत. रविवारी दुपारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर व शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत माढा लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केल्याने मोहिते पाटील व रामराजे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते- पाटलांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र कार्यकर्त्यांमधून विविध पोस्ट व्हायरल होत होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी अचानकपणे शिवरत्न बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. दुपारी रामराजे निंबाळकर व त्यांचे बंधू संजीव निंबाळकर दोघेही एकाच गाडीतून शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले. भाजपकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागतही केले.

त्या पाठोपाठ इंडिया आघाडीचे राज्य समन्वयक तथा शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील ही त्या बैठकीला उपस्थित राहिले. याशिवाय करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापाचे डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह मोहिते पाटील समर्थक उपस्थित होते. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मोहिते पाटलांनी कोणती भूमिका घेतली. याबाबत अद्यापही समोर आले नाही. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.