मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

By विठ्ठल खेळगी | Published: March 17, 2024 03:16 PM2024-03-17T15:16:47+5:302024-03-17T15:17:09+5:30

या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

Meeting started between Ramraje Nimbalkar and Jayant Patil of Shekap at the residence of Mohite-Patils | मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

विठ्ठल खेळगी
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघाच्या हालचाली वाढल्या आहेत. रविवारी दुपारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर विधान परिषदेचे माजी सभापती अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर व शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत माढा लोकसभेची उमेदवारी पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केल्याने मोहिते पाटील व रामराजे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते- पाटलांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र कार्यकर्त्यांमधून विविध पोस्ट व्हायरल होत होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी अचानकपणे शिवरत्न बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. दुपारी रामराजे निंबाळकर व त्यांचे बंधू संजीव निंबाळकर दोघेही एकाच गाडीतून शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले. भाजपकडून इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागतही केले.

त्या पाठोपाठ इंडिया आघाडीचे राज्य समन्वयक तथा शेकापाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील ही त्या बैठकीला उपस्थित राहिले. याशिवाय करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापाचे डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह मोहिते पाटील समर्थक उपस्थित होते. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मोहिते पाटलांनी कोणती भूमिका घेतली. याबाबत अद्यापही समोर आले नाही. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Meeting started between Ramraje Nimbalkar and Jayant Patil of Shekap at the residence of Mohite-Patils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.