शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाला चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीनं लॉजमध्ये भावी डॉक्टरनं घेतला गळफास; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

By विलास जळकोटकर | Updated: June 5, 2023 22:19 IST

सतत अनुत्तीर्ण होत असल्यामुळं नैराश्य

सोलापूर : डॉ. वैशंपायन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने तोंडाला कागदी चिकटपट्टी लावून नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास एका हॉटेलमध्ये ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. आकाश संतोष जोगदंड (वय २४, रा. चौसाळा, जि. बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

यातील आकाश हा येथील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी शिक्षण घेत होता. २०२० सालात त्याने प्रवेश घेतला होता. गेल्या दोन  प्रयत्नात तो अनुत्तीर्ण झाला होता, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनाकडून मिळाली आहे. पोलीस सूत्रांनुसार  आकाश ३० मे रोजी गावाकडून सोलापुरात आला होता. सावकर मैदानाजवळील हाॅटेलमध्ये रूम नं. ४ मध्ये थांबलेला होता. सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास त्याने रूममध्ये नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तोंडाला कागदी पट्टी लावल्याच्या अवस्थेत तो आढळून आला.

संबंधित घटना समजताच हॉटेल प्रशासनाकडून तातडीने फौजदार चावडी पोलिसांना खबर देण्यात आली. दरवाजा उघडेना म्हणून तो तोडून  पोलिसांनी आत प्रवेश केला असता तो लटलेल्या अवस्थेत दिसला. येथे सुसाईट नोट मिळून आली.त्यातील मामाचा  मोबाईल नंबर होता, त्यांना बोलावून घेतले. पंचनामा करुन पंचनामा करण्यात आला दुपारी २ च्या सुमारास शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. सुसाईड नोट मिळाली

आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहून ठेवली होती.या त्याने एमबीबीएस परीक्षेत नापास होत असल्याने स्वत:हून जीवन संपवत आहे, कोणालाही जबाबदार ठरवू नये, म्हटले आहे. तसेच ही गोष्ट अगोदर माझ्या मामांना सांगावी म्हणून त्यांचा मोबाईल क्रमांक नमूद केला होता. आईला भावनिक आवाहन करताना त्याने ‘आई तू व दीदीला सांभाळ’ असे म्हटले आहे.नैराश्येतून केली आत्महत्या

गळफास घेतलेला विद्यार्थी आकाश  जोगदंड याने २०२० साली एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. दोन वेळा त्याचे विषय गेल्यामुळे तो अनुत्तीर्ण झालेला होता. त्याच्यासोबतचे अन्य विद्यार्थी तृतीय वर्षासाठी शिक्षण घेत होते. या नैराश्येतून त्याने हे कृत्य केल्याचे सुसाईट नोटमध्ये स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरDeathमृत्यू