शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'मावळ अन् बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव', अखेर विजयसिंह मोहिते पाटील बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:47 IST

दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले? असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या सभेत शरद पवारांना विचारला होता.

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या टीकेला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागेल, असा विश्वास मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला. अकलूज येथे मतदान केल्यानंतर बोलताना मोहिते पाटील यांनी पवारांना लक्ष्य केलं.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवारांनी आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका असा टोला मोहिते पाटलांना लगावला होता. त्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या विधानवर टीका केली होती. 

दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले? असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या सभेत शरद पवारांना विचारला होता. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या वाटेवर आहे. अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर, पवार यांनी माढ्यातील सभेत विजयसिंह यांच्यावर जबरी टीका केली होती. त्यानंतर, आता विजयसिंह यांनीही या टीकेवर मौन सोडले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील 14 जागांसह देशातील 117 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत.

टॅग्स :Vijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019