शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळं गणेशोत्सवाची गणितं बदलली; सोलापूरच्या मूर्ती यंदा सांगली-कोल्हापुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:35 IST

गणेशमुर्तींना परराज्यातून मागणी वाढली : आंध्रप्रदेश-कर्नाटकातही मूर्ती जाणार

ठळक मुद्देराज्यात सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख यंदा सांगली-कोल्हापूरभागात सोलापूरचे बाप्पा विराजमान होण्यासाठी जात आहेतसोलापुरातील जवळपास ५० ते ६० टक्के मूर्ती या आंध्रप्रदेश, हैदराबाद, कर्नाटक या भागात विक्रीस जातात

सोलापूर : राज्यात सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख आहे. हा उत्सवही मोठ्या प्रमाणात राज्यासह देशभरातही साजरा केला जातो पण यंदा कोल्हापूर, सांगली, पंढरपूर आदी भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीमुळे या भागात गणपती मूर्ती हे कमी प्रमाणात बनवले आहेत. यामुळे शेजारील शहर, जिल्ह्यातून यंदा गणपती आणून विक्री केल्याशिवाय व्यापाºयांना पर्याय नाही़ यामुळे येथील व्यापारी सोलापुरात येऊन मूर्ती घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे यंदा सांगली-कोल्हापूरभागात सोलापूरचे बाप्पा विराजमान होण्यासाठी जात आहेत.

सोलापुरात एकू ण लहान-मोठे असे जवळपास दोनशेच्या पुढे मूर्तिकार आहेत. यातील ५० मूर्तिकार हे प्रत्येक वर्षी दहा ते वीस हजारांदरम्यान मूर्ती बनवत असतात़ हे मूर्तिकार सहा महिन्यांपासूनच याची तयार करत असतात. 

इतर सर्व मूर्तिकारांकडून जवळपास पाच लाखांच्या पुढे लहान-मोठ्या आकाराच्या मूर्ती बनवल्या जातात़ याचबरोबर औरंगाबाद, पेण, गणपतीपुळे आदी भागातूनही मूर्ती आणल्या जातात़ या भागातील मूर्तींना जास्त दरही मिळतात, असे व्यापाºयांचे मत आहे.

सोलापुरातील जवळपास ५० ते ६० टक्के मूर्ती या आंध्रप्रदेश, हैदराबाद, कर्नाटक या भागात विक्रीस जातात़ तर उर्वरित मूर्ती या शहर-जिल्ह्यात विकल्या जातात़ काही वेळेस सोलापूरच्या बाजारात हजारो गणपती शिल्लक राहत असतात़ यंदा सोलापूर शहरात मूर्ती शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे, असे मूर्तीकार आणि व्यापाºयांकडून बोलले जात आहे.

लहान मूर्र्तींना मागणी- काही दिवसांपासून सांगली-कोल्हापूरची स्थिती सामान्य होत आहे़ यामुळे येथील व्यापारी मूर्ती घेण्यासाठी सोलापूरला येत आहेत़ सध्या पूरजन्य भागातून पाच फुटाच्या आतील गणपतीची मागणी वाढत आहे़ मोठ्या गणपतींपेक्षा लहान म्हणजे पाच फुटातील गणपतींची आॅर्डर दिली जात आहे़ तेथील काही व्यापाºयांच्या मतानुसार यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा अनेक मंडळांचा विचार आहे़ यामुळे मोठमोठ्या मूर्ती न घेता मंडळासाठी पाच फुटांपर्यंत घेण्यात येत आहे, अशी माहिती मोठ्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार रामुस्वामी चिन्नी यांनी दिली.

गेल्या वीस वर्षांपासून मी मूर्ती बनवतो़ प्रत्येक वर्षी मूर्तींची मागणी वाढत असते़ या मूर्ती हैदराबाद, कर्नाटक येथे जात असतात़ हैदराबादमध्ये सोलापूरच्या मूर्तींची मागणी जास्त आहे़ सोलापुरात जवळपास पाच लाख मूर्ती बनवल्या जातात़ यातील साठ टक्के मूर्ती परराज्यात पाठविल्या जातात-भास्कर तुम्मामूर्तिकार 

आम्ही प्रत्येक वर्षी जवळपास दहा हजार लहान मूर्ती बनवत असतो़ यातील बहुतांश गणपती हे आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये जात असतात़ पण यंदा सांगली-कोल्हापूरमध्ये मूर्तींचा तुटवडा असल्यामुळे तेथील काही प्रमाणात व्यापाºयांनी मूर्ती बुक केल्या आहेत, पण पुढील काळात मागणी वाढेल अशी चिन्हे आहेत़ प्रत्येक वर्षी बाजारात अधिक मूर्ती असतात़.-अनिल बडगू, मूर्तिकार

टॅग्स :SolapurसोलापूरGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सवSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर