शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्याच्या तंबीनंतर रात्रीच पोहचविले प्राथमिक आरोग्य केंद्रांना साहित्य...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:21 IST

आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या घरी जाऊन केली तक्रार; पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापले...

ठळक मुद्देआरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेटपालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना झापलेजिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर वाचला पाढा

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आरोग्य साहित्य खरेदीस विलंब करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फोन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांना तंबी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी रविवारी थेट पालकमंत्री भरणे यांचे घर गाठले व कैफियत मांडल्यावर ते संतापले.  

जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून पगार नाही कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करीत असताना त्यांचे वेतन, सुरक्षा साहित्य, औषधे पुरविण्याकडे जिल्हा परीषदेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले. याबाबत कर्मचारी संघटनेने निवेदन देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे आरोग्य कर्मचारी संतापले. त्यांनी पालकमंत्री भरणे यांच्या अंथुरणे ( जि. पुणे) येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराबाबत कैफियत मांडली.

नुकतीच त्यांनी कोरना परिस्थितीचा आढावा घेतला होता, त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार यांना कर्मचाऱ्यांना तातडीचे साहित्य करण्याबाबत सूचना केली होती पण तरीही आरोग्य प्रशासन गाफील असल्याचे पाहून यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना फोन केला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांना सूचना केली. 

यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे  वेतन न होणे, जनतेतील उपद्रवी लोकांकडून सरंक्षण, कोरोना साथीच्या काळात सरंक्षण साहित्य किट वाटप करण्याची प्रशासनाला सूचना करण्याची मागणी केली.पालकमंत्र्यांनी तात्काळ सीईओ वायचळ यांना संपर्क करून  समस्या निवारण करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी शिवराज जाधव, विजया चव्हाण, प्रकाश बिराजदार, चंदू  सुळ, शबाना तांबोळी, सदा बंडगर,  नवा कपणे, कमलेश महाजन, बबलू धाबटे, बापू सनस,  रेखा पवार,  मीनाक्षी शिंगाडे, श्रीकृष्ण  घंटे उपस्थित होते.  

रात्री साहित्य रवाना... 

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना तंबी दिली. त्यानंतर रविवारी रात्रीच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय