शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या तार्इंना सेना-भाजपचं जोरदार आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:05 IST

वेध विधानसभेचे; शहर मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीत वाढतेय इच्छुकांची गर्दी

ठळक मुद्देएमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांना अटक झाल्याने वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता

राकेश कदम

सोलापूर:  शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेना आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांना अटक झाल्याने वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

शहर मध्यमधून आमदार प्रणिती शिंदे सलग दोनवेळा निवडून आल्या आहेत.  पहिल्या वेळेस त्यांनी माकपचे नेते नरसय्या आडम यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीत एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनी त्यांना आव्हान दिले होते. अटीतटीच्या लढतीत प्रणिती शिंदे यांनी विजय मिळविला.

 शिंदे यांची मतदारसंघावर चांगली पकड आहे. आक्रमक भाषणशैली, थेट मतदारांशी संपर्क यामुळे प्रणिती यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांना परिश्रम घ्यावे लागतात. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले. काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांच्या प्रभागात काँग्रेस मागे राहिली. ही आकडेवारी पाहून आमदार प्रणिती शिंदे यांनी नकारात्मक प्रभागांमध्ये स्वतंत्र दौरे सुरू केले आहेत. कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्याचा अहवाल तार्इंच्या कार्यालयाला कळवित आहेत. महापालिकेतील वादातून नगरसेवकांमध्ये धुसफूस आहे. त्यातून काँग्रेसची यंत्रणा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. 

मागील निवडणुकीत एमआयएम हा काँग्रेसचा मुख्य शत्रू होता. यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना हाच काँग्रेसचा मुख्य प्रतिस्पर्धी असेल. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास प्रणिती शिंदे यांना निकाराची झुंज द्यावी लागेल.

वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख प्रमुख दावेदार मानले जात होते, परंतु विजयपूर येथील काँग्रेसची कार्यकर्ता रेश्मा पडकेनूर यांच्या खून प्रकरणात तौफिक शेख यांना अटक झाली.  या मतदारसंघात एमआयएमची व्होट बँक आहे. यामुळे वंचित आघाडीची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्रत्येक बुथला शिवसेनेचे नियोजन- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यंदा पुन्हा मैदानात असतील. या मतदारसंघात कोठे आणि परिवाराची एक व्होट बँक आहे. शिवाय प्रत्येक बुथनिहाय एक शाखा सुरू करण्याचे नियोजन शिवसेनेने सुरू केले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास कोठेंचा मार्ग सुकर होईल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. पण युती तुटल्यानंतर कोठे भाजपमध्ये गेलेच तर ऐनवेळी नवा उमेदवार कुठून आणायचा याची धाकधूक शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाºयांमध्ये आहे. त्यातच शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा अस्मिता गायकवाड यांनीही तयारी सुरू केली आहे. 

घरकुलांमुळे मास्तरांचा विश्वास दुणावला- लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभेला मात्र माकप स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहे. रे नगर येथील ३० हजार घरकूल प्रकल्पाचे काम मंजूर झाल्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम यांचा विश्वास दुणावला आहे. काँग्रेसचे तगडे समाजकारण आणि तगडे अर्थकारण, भाजप, शिवसेना आणि एमआयएमचे धार्मिक राजकारण या गोंधळात माकपचा आवाज कुठपर्यंत पोहोचेल याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात शंका दिसते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणPraniti Shindeप्रणिती शिंदे