शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

सासरच्या जाचाला कंटाळून तांदूळवाडीत विवाहितेची आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 19, 2024 20:31 IST

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सासरच्या जाचाला कंटाळून माळशिरस तालुक्यात तांदूळवाडी येथे अनिता सचिन सुरवसे (वय २३) या विवाहितेने रविवारी दुपारी विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली. सायंकाळी उशीरा हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी वेळापूर पोलिसांनी नवरा, सासू, दोन नंदा आशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अनिताचे वडील अर्जुन सुखदेव माने (रा. दसूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार अनिता हिचे लग्नानंतर एक वर्षातच वाहनासाठी पैसे आणावेत आणि दोन मुलीच आहेत, मुलगा हवा म्हणत दवाखान्याचा खर्च आण म्हणून सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासास कंटाळून घराजवळील विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती सचिन पांडुरंग सुरवसे, सासू कोंडाबाई पांडुरंग सुरवसे, नणंद शुभांगी राजेंद्र भोसले (रा. धायटी), नणंद पाली दत्तात्रय महाकाळ (रा. वासूद अकोले) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करून माळशिरस येथील न्यायालयात हजर केले असता २१ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पुढील तपास वेळापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.---पतीकडून मिसिंग दाखलतिने आत्महत्या केल्याचे उघड होण्यापूर्वी पत्नी अनिता ही बेपत्ता झाल्याबाबत मिसिंग वेळापूर पोलिस स्टेशनला दाखल झाली होती. ही मिसिंग १५ फेब्रुवारी रोजी पती सचिन सुरवसे याने दिली होती.

टॅग्स :Solapurसोलापूर