शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील बाजारपेठा हाऊसफुल्ल; 'सोशल डिस्टन्स'चा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 14:30 IST

किराणा दुकानांसमोर रांगाच रांगा; भाजीमंडईतही गर्दी, गर्दी वाढल्याने पोलिसांनी केली दुकाने बंद...!!

ठळक मुद्देकिराणा माल खरेदीसाठी सोलापुरात नागरिकांनी केली गर्दीशुक्रवारी बाजारपेठ परिसरात सोशल डिस्टन्स चा अभावविनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी केली कारवाई

सोलापूर  : सोलापूर शहरात कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरातील संचारबंदी सोमवारपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, खरेदीसाठी सोलापूरकरांना शुक्रवारी सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत सवलत दिली होती. मात्र या सवलतीचा फायदा घेत सोलापूरकरांनी शहरातील सर्वच बाजारपेठ परिसरात खरेदीसाठी गर्दी केली. याचवेळी प्रशासनाने सांगितलेले सर्व नियम धाब्यावर बसवून शहरवासीयांनी खरेदीसाठी गर्दी केली. 

दरम्यान, गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी दुपारी १२ पासून सोमवारी मध्यरात्री १२ पर्यंत असे चार दिवस सलग शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. पुढील तीन दिवस काहीच मिळणार नसल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुंबळ गर्दी झाली. दुपारचे १२ वाजत असूनही किराणा दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पोलिसांच्या भीतीने अखेर दुकानदारांनी शटर डाऊन केल्याने काहींना रिकाम्या हाताने परतावे लागले. तीन दिवसांचा बंद लक्षात घेता कित्येकांनी शुक्रवारी सकाळी ७ वाजतापूर्वीपासूनच आपली दुकाने उघडली होती.

सोलापुरातील कुंभार वेस, टिळक चौक, सात रस्ता, आसरा चौक, शिवाजी चौक, चिप्पा मंडई, नेहरू नगर मैदान, होम मैदानावर भाजी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जीवनावश्यक साहित्याची खरेदी करताना नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची भीती, सोशल डिस्टन्सिंग याचाही विसर पडला. तीन दिवस बंद असल्याने पोलिसांनीही या गर्दीकडे काहिसे दुर्लक्ष केले. परंतु दुपारी १२ वाजताच पोलिसांनी वाहनातून फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. १२ नंतर शहरातील रस्त्यांवर पुन्हा सामसूम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुढील तीन दिवस केवळ दवाखाने, मेडिकल सुरू राहणार आहे. दुधाच्या दुकानांना सकाळी व सायंकाळी ६ ते ८ या दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. शुक्रवारच्या बाजारपेठेतील गर्दीने मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस