शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील वॉटरकप स्पर्धेसाठी मराठवाड्यातील प्रतिनिधी घेणार उत्तर तालुक्यात प्रशिक्षण, हिरज, भागाईवाडीत प्रशिक्षण केंद्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 13:26 IST

पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठळक मुद्देपाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्याची निवड गाव पातळीवर श्रमदान व अन्य कामात पदाधिकारी म्हणून भाग घेणार सर्वच गावांनी वॉटरकप स्पर्धेसाठी भाग घ्यावा व आपली गावे पाणीदार करावीत : विकास गायकवाड

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : पाणी फाउंडेशनच्या वतीने तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज व भागाईवाडी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या जिल्ह्यातील काही तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.पाणी फाउंडेशनच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या वॉटरकप स्पर्धेसाठी उत्तर सोलापूर तालुक्याची निवड करण्यात आली होती. यामध्ये भागाईवाडी, हिरज, बेलाटी, नान्नज, पडसाळी व राळेरास या गावांनी चांगले काम केले होते. त्यापैकी हिरज व भागाईवाडीच्या ग्रामस्थांनी झोकून देऊन पाणी अडविण्याची कामे श्रमदानातून केली होती. यामुळे स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांत पाणी अडविण्याची कामेही झाली अन् पाणीही अडले आहे. सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून भागाईवाडी व हिरजच्या ग्रामस्थांनी कामाचा ठसा उमटविल्याने पाणी फाउंडेशनने या दोन्ही गावांत अन्य गावांतील नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिरज गावाची व शिवाराची पाहणी करून प्रशिक्षक टीमने हिरजची प्रशिक्षण केंद्रासाठी निवड केली. त्याप्रमाणे भागाईवाडी गावाचीही पाहणी केली असून हे गावही प्रशिक्षणासाठी योग्य असल्याचे प्रशिक्षक टीमचे म्हणणे आहे. या दोन्ही गावात जिल्ह्यातील काही तालुक्यातील निवडलेल्या गावातील पाच प्रतिनिधी तसेच मराठवाड्यातील काही गावच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार दिवस चालणारे हे प्रशिक्षण निवासी असणार आहे.--------------------उत्तर तालुक्यातील काही गावांनी मागील वर्षी चांगले काम केल्याने ती गावे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास योग्य झाली. यावर्षी तालुक्यातील अधिक गावांत चांगले काम होईल, असा आमचा प्रयत्न राहील. गाव पातळीवर श्रमदान व अन्य कामात पदाधिकारी म्हणून भाग घेणार असून तालुक्यातील काही गावे राज्य पातळीवर चमकतील.-संध्याराणी पवारसभापती, पंचायत समिती उत्तर तालुका-------------------सोलापूरचे सहा तालुके...- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व उत्तर सोलापूर हे दोन तालुके मागील वर्षी वॉटरकप स्पर्धेसाठी निवडले होते. यावर्षी सांगोला, मंगळवेढा, बार्शी, माढा, करमाळा व उत्तर तालुक्याची निवड तिसºया वॉटरकप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांनी वॉटरकप स्पर्धेसाठी भाग घ्यावा व आपली गावे पाणीदार करावीत, असे आवाहन समन्वयक विकास गायकवाड यांनी केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर