शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण;  सोलापूरातील शिवाजी चौकात दगडफेक, पोलीस उपायुक्तांची गाडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:51 IST

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद असताना शिवाजी चौकातील दगडफेकीने आंदोलनाला हिंसक वळण लागले़ सोलापूर शहरातील शिवाजी चौकात दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांची गाडी आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून फोडली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल ...

ठळक मुद्दे- सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद- पोलीसांचा सौम्य लाठीचार्ज-आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद असताना शिवाजी चौकातील दगडफेकीने आंदोलनाला हिंसक वळण लागले़ सोलापूर शहरातील शिवाजी चौकात दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांची गाडी आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून फोडली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़ याचवेळी दुपारी बाराच्या सुमारास काही आंदोलनकर्त्यांनी शिवाजी चौकात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

यावेळी पोलीसांनी घोषणाबाजी करू नका अशी विनंती केल्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलीसांवर दगडफेक केली़ याचवेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्यासह अग्निशामक दलाची गाडी फोडली़ यावेळी पोलीसांनी आंदोलन कर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStrikeसंपSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस