शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वांगीत ११७ एकरात होणार मनोज जरांगे-पाटलांची सभा

By दिपक दुपारगुडे | Updated: November 13, 2023 19:00 IST

करमाळामार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीनमार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल.

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे उजनी धरणाच्या काठावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून लढा उभारलेले मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. बुधवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सभेचे नियोजन पूर्ण झाले असून, सभेचे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. तब्बल ११७ एकरांमध्ये सभा होणार आहे.

या सभेसाठी येणाऱ्या लोकांना दोन मुख्य मार्ग उपलब्ध असून, टेंभुर्णीकडून येणाऱ्या लोकांना लोकविकास डेअरीपासून थेट वांगी नंबर एक येथे सभास्थळाकडे जाता येणार आहे. तर करमाळामार्गे येणाऱ्या लोकांसाठी शेलगाव येथून वांगी नंबर तीनमार्गे सभा ठिकाणाकडे येता येईल. गावापासून पश्चिम दिशेला दीड किलोमीटर अंतरावर सभेचे ठिकाण असून, या दरम्यान तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गावापासून सभास्थानापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, तो एक दिवसात पूर्ण होणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छता व काटेरी झुडपे काढण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या परिसरातील दहा जे. सी. बी. मशिन दोन दिवसांपासून कार्यरत आहेत. या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून याठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सभा संध्याकाळी असल्याने सेवेच्या ठिकाणी व रस्त्याने विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी आलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सातशे स्वयंसेवक काम करणारमनोज जरांगे-पाटील यांच्या सभेच्या नियोजनासाठी गावातील व या परिसरातील सातशे तरुण स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने काम करणार आहेत. सभा नियोजनासाठी केवळ सकल मराठा समाजाचे कार्यकर्तेच नाहीत तर इतर समाजाचेही कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. १७१ एकर क्षेत्रावर होणाऱ्या या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित राहील, असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील