शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा पोलीसांनी अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पिकअपसह २३ लाखाचा गुटखा जप्त करून तिघांना केले गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2023 17:20 IST

कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख  ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८ लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे

कर्नाटक राज्यातून मरवडेमार्गे जीपमधून जाणारा १५ लाख  ४० हजार रुपये किंमतीचा गुटखा व ८  लाखाची जीप असा एकूण २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाने जप्त केला आहे.  याप्रकरणी संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय ३९ वर्षे रा. कमलापूर ता. सांगोला), बिन्नी गणपती नाव्ही (वय ३२ वर्षे जालिहाळ बु॥ ता. जत), अमित विभुते (रा. मंगेवाडी ता. सांगोला)  पिकअप वाहन मालक  तानाजी माळी (रा. एकतपूर रोड सांगोला) , गुटखा पुरवठादार मल्लु चांदकोटी (रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर)  यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस निरीक्षक रणजित माने  यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून एक महिंद्रा बोलेरो पिकअपमधून काही लोक हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैध्यरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोहेकॉ महेश कोळी, सुनिल मोरे, मळसिध्द कोळी,  अजित मिसाळ, खंडाप्पा हात्ताळे या टीमने मरवडे गावाजवळ नाकाबंदी केली. यावेळी आलेल्या पिकअपच्या हौदयात काय आहे, असे विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने आम्ही त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर पिकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सदर तिन्ही आरोपींना पिकअपसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने  व त्याचे पथकातील पोहेकॉ महेश कोळी, सुनिल मोरे, मळसिध्द कोळी,  अजित मिसाळ, खंडाप्पा हात्ताळे या पथकाने केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी