शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

सुट्ट्या अन् दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी

By काशिनाथ वाघमारे | Updated: December 23, 2023 19:36 IST

शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती याचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता भाविकांची मांदियाळी जमली आहे.

 सोलापूर  : सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव सोहळा मंगळवार, २६ डिसेंबर रोजी येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात पार पडत आहे. त्यानिमित्त २३ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ दरम्यान दरवर्षी दर्शनासाठी गर्दी लोटते. शासकीय व नाताळाच्या सुट्टया, दत्त जयंती याचे औचित्य साधून नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता भाविकांची मांदियाळी जमली आहे.

२६ डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्त देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान वाचन, व भजन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होईल.

दत्त जयंती दिनी भक्त निवास येथील भोजन कक्षात भक्तांना दुपारी महाप्रसाद देण्यात येणार आहे. बुधवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी नैवेद्य आरती होईल. त्यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप होईल. सायंकाळी ५ ते रात्री ९.३० या वेळेत शहरातून श्रींची पालखी मिरवणूक भजन, दिंड्या व वाद्यांसह निघणार आहे. सालाबादप्रमाणे अक्कलकोट शहरातून पालखी सोहळा निघत असल्याची माहिती मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

नित्य अभिषेक थांबवणार, भाविकांसाठी निवासाची सोय* या काळात स्वामी भक्तांना सुलभतेने दर्शन व्हावे म्हणून नित्यनियमाने होणारा अभिषेक थांबविण्यात येत आहेत.  * भांडूप, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, पुणे, रत्नागिरी या ठिकाणांहून दिंडी व पालखीसोबत पायी येणा-या सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन, प्रसादाची व निवासाची सोय मैंदर्गी रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवासात करण्यात आली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर