शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वीस लाखाच्या खंडणीसाठी माळशिरस येथील डॉक्टर मुलाचे अपहरण; आठ तासात सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 11:09 IST

सोलापूर ग्रामीण पोलिसांची यशस्वी कामगिरी

ठळक मुद्देतीन आरोपी माळशिरस पोलिसांच्या ताब्यातसोलापूर ग्रामीण पोलिसांची यशस्वी कामगिरी

माळशिरस :  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डॉ. सिध यांच्या पाच वर्षीय ईशानचे २० लाख खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते, मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करून मुलाची सुखरूप सुटका केली तसेच तीन आरोपींना ताब्यातही घेतले आहे.

या प्रकरणात आणखीन पाच आरोपी असण्याची शक्यता आहे. यापैकी एक आरोपी डॉ. सिद यांच्या रुग्णालयात कपौंडर म्हणून काम करीत होता, असे पोलिसांनी सांगितले.

माळशिरस येथील डॉ.सिध यांचा मुलगा ईशानचे (वय ५ वर्षे) शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केले होते. त्याच्या तपासासाठी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवळी सहा. पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंजुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ३५३ उबाळे, पोलीस नाईक कांबळे, पोलीस नाईक औटी यांच्या पथकाने  ईशानचा शोध घेऊन त्याला रात्री ११ वा माळशिरस पोलीस ठाण्यात सुखरूप आणुन आई वडिलांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून माळशिरस येथील २ सदाशिवनगर येथून ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे तर अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ईशानला पोलिसांनी सतर्कतेने सुखरूप सोडवल्याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसdocterडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी