शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ९७ हजार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 17:18 IST

राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज वविलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

ठळक मुद्दे१ जून २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीरथकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल

सोलापूर :-  वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेत सहभागी होणाºया औद्योगिक ग्राहकांच्यामुळ थकबाकीवरील व्याज व विलंबआकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे ९७ हजार ४६४ औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे २३१ कोटीचा व्याज वविलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने १ जून २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८ या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. अशाग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यातमुळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना १०० टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. १ जूलै २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१८  या दरम्यान ग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम वव्याजाची २५ टक्के रक्कम भरली तर उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे. 

जे न्यायालयीन प्रकरण १२ वर्षापेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्णभरल्यास त्या ग्राहकाला १०० टक्केव्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जेन्यायालयीन प्रकरण १२ वर्षेपर्यंतचे आहेव न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिलीआहे. अशा ग्राहकांनी एका टप्प्यातडिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना ५० टक्केव्याजमाफीची सूट मिळणार आहे. या सर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्चसंबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.

 ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख/नेटपेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत  ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे़ या योजनेत १ जून २०१८ पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केलेआहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण